अझीम प्रेमजी यांनी केलं रोज 27 कोटी रुपये दान; हे आहेत भारतातील टॉप 10 दानशूर अब्जाधीश
नवी दिल्ली,
कोरोना काळात एकीकडे भारतीय अर्थव्यवस्था रसातळाला गेली होती तर दुसरीकडे भारतीय अब्जाधीशांच्या संपत्तीत कित्येक पटीने वाढ होत होती. या संपत्तीचा वापर कशाप्रकारे करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण कोरोनाच्या वाईट काळात आपल्या संपत्तीचा वापर कशा प्रकारे समाजासाठी केला जाऊ शकतो हे विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी यांनी दाखवून दिलं आहे. 2020-21 या वर्षात अझीम प्रेमजी यांनी दररोज 27 कोटी रुपये दान केल्याचं समोर आलं आहे. मानवतावादी कार्यात सर्वाधिक दान करणार्यांच्या यादीत त्यांनी आपलं सर्वोच्च स्थान कायम ठेवलं आहे.
ह्युरन इंडिया ने भारतातील सर्वाधिक दानशूर व्यक्तींची यादी प्रसारित केली आहे. त्यात अझीम प्रेमजी हे मानवतावादी कार्य करणार्यांसाठी आदर्श असल्याचे सांगण्यात आले आहे. विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी यांनी 2020-21 या वर्षी 9,713 कोटी रुपये दान केले आहेत.
अझीम प्रेमजी यांनी दहा राज्यांमध्ये कोरोना लसीकरणाच्या कार्यात आपलं योगदान दिलं आहे. भारतात कोरोनाच्या प्रसाराच्या सुरुवातीच्या काळात म्हणजे 1 एप्रिल रोजी अझीम प्रेमजी यांनी कोरोनाविराधातील लढाईसाठी 1,125 कोटी रुपयांचे योगदान दिले होते. त्यानंतर या रक्कमेत त्यांनी वाढ करुन ती 2,125 कोटी रुपयांपर्यंत वाढवली आहे. ही रक्कम विप्रोच्या वार्षिक ण्एीं फंडाच्या आणि त्यांच्या इतर मानवतावादी कार्याच्या व्यतिरिक्त होती.
हउङ टेक्नॉलॉजीचे प्रमुख शिव नादर हे दानशूर लोकांच्या यादीत दुसर्या क्रमांकावर येतात. त्यांनी 2020-21 या काळात 1,263 कोटी रुपये दान केले आहेत. त्यानंतर रिलायन्सच्या मुकेश अंबानींचा नंबर लागत असून त्यांनी या काळात 577 कोटी रुपये दान केले आहेत. कुमार मंगलम बिर्ला यांचा या यादीत चौथा क्रमांक लागत असून त्यांनी 377 कोटी रुपये दान केले आहेत.
या यादीत पाचव्या स्थानी नंदन निलकेनी आहेत. त्यांनी 183 कोटी रुपये दान केले आहेत तर सहाव्या स्थानी असलेल्या हिंदूजा परिवाराने 166 कोटी रुपये दान केले आहेत. बजाज परिवाराचा या यादीत सातवा क्रमांक आहे तर आठव्या क्रमांकावर गौतम अदानी तर नवव्या क्रमांकावर अनिल अग-वाल यांचा समावेश आहे. दहाव्या क्रमांकावर डाबर ग-ुपच्या बर्मन परिवाराचा क्रमांक आहे.