केंद्र सरकारची नियत व धोरण दोनीही शेतकरी विरोधी – प्रियंका गांधी
नवी दिल्ली,
शेतकरी मेहनत करुन धान्य पिकवत आहे परंतु त्याला किंमत नाही. शेतकरी धान्य पिकविण्याची तयारी करत आहे परंतु खत नाही. खत न मिळाल्याने बुंदेलखंडातील दोन शेतकर्यांचा मृत्यू झाला आहे. परंतु शेतकरी विरोधी भाजप सरकारच्या काना पर्यंत हा आवाज जात नाही. त्यांचे नियत व धोरण दोनीहीमध्ये शेतकरी विरोधी दृष्टिकोण आहे असा आरोप काँग-ेसच्या महासचिव प्रियंका गांधीनी गुरुवारी केला.
उत्तर प्रदेशमध्ये होणार्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्यभूमीवर गोरखपूरमध्ये शुक्रवारी होणार्या एका मोठया जनसभेच्या आधी प्रियंका गांधीनी भाजप सरकारवर निशाना साधला. याच्या आधी बुधवारी प्रियंका गांधीनी पक्ष महासचिवांची एक उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. जवळपास अडीच तास चालेल्या या बैठकीमध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीला पाहता महासचिवांची एक टिम बनवली गेली आहे जी पक्षासाठी राज्यात रणनिती तयार करेल.
सूत्रानुसार या बैठकीमध्ये पक्षाचे महासचिव तारिक अन्वर यांनी म्हटले की तीनीही कृषी कायदे आणि शेतकर्यांचा मुद्दा महत्वपूर्ण आहे. याला निवडणुकीत महत्वाचा मुद्दा बनविला पाहिजे. उत्तर प्रदेशमध्ये शेतकर्यांची मोठी संख्या आहे आणि याचा प्रभावही पाहिला मिळू शकतो. यावर प्रियंक गांधीनी सहमती व्यक्त केली.
प्रिंयका गांधी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा गड असलेल्या गोरखपूरमध्ये 31ऑक्टोबरला एक सभा करणार आहेत. काँग-ेसकडून या सभेसाठी मोठया संख्येत शेतकर्यांना आणण्याची तयारी केली जात आहे. प्रियंका गांधी या सभेत शेतकर्यांच्या संदर्भात काही नवीन घोषणाही करु शकतात. याला पाहता गुरुवारी प्रियंका गांधीनी केंद्र सरकारवर निशाना साधला आहे.
याच्या आधी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांना पाहता काँग-ेसने आपल्या प्रतिज्ञा यात्रेच्या दरम्यान शेतकरी, महिला, युवा आणि बेरोजगारीला आपल्या ऐजेंडयात सामिल करत प्रियंका गांधी आश्वासने देत आहेत.