देशातील खतांच्या तुटवड्याबद्दलच्या अफवा दूर करण्यासाठी भगवंत खुबा यांनी पत्रकार परिषद घेतली

नवी दिल्ली,

केंद्रीय रसायने आणि खते राज्यमंत्री भगवंत खुबा यांनी देशातील खतांच्या तुटवड्याबाबत अफवा दूर करण्यासाठी पत्रकार परिषदेला संबोधित केले. या अफवा खोट्या आणि निराधार असल्याचे सांगत त्यांनी शेतकर्‍यांना खतांच्या तुटवड्यासंबंधी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले.

विकाससुधा येथे पत्रकार परिषदेत बोलताना खुबा म्हणाले, फगेल्या दोन वर्षांत महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटकच्या काही भागात मिश्र खतांचा वापर वाढत आहे. राज्यातील शेतकर्‍यांनी मिश्र खतांचा अवलंब केल्यास त्यांना त्याचा फायदा होईल. डीएपीपेक्षा मिश्र खत चांगले परिणाम देते. त्यामुळे सरकार डीएपीऐवजी मिश्र खत खरेदी करण्याची शिफारस करत आहे.

ते म्हणाले की, देशात खतांचा तुटवडा भासणार असल्याच्या अफवा काही भागांत पसरल्या असून, शेतकर्‍यांनी पुढील चार महिने पुरेल इतके खत साठवून ठेवावे, असे संगितले जात आहे. मात्र हे आरोप पूर्णपणे निराधार आहेत असे त्यांनी स्पष्ट केले. ‘खते विभागाचा प्रभारी मंत्री या नात्याने मी शेतकर्‍यांना आश्वासन देतो की, त्यांना आवश्यक तेवढे खत उपलब्ध करून दिले जाईल‘, असे ते पुढे म्हणाले.

खुबा म्हणाले की, फया वर्षी नॅनो युरियाचे उत्पादन वाढले आहे. नॅनो डीएपीचे उत्पादन पुढल्या वर्षापासून सुरू होईल. कर्नाटकात 22 लाख मेट्रिक टन युरिया उपलब्ध आहे. रब्बी हंगामासाठी 2 लाख मेट्रिक टन डीएपीची गरज असून, त्याचे उत्पादन होणार आहे. आम्ही दोन कारखान्यांवर कारवाई केली आहे. यंदा संपूर्ण कर्नाटक राज्यात चांगला पाऊस झाला आहे आणि 78.51 लाख हेक्टर जमिनीवर पेरणी झाली आहे असे केंद्रीय मंत्री म्हणाले.

फपेरणीसाठी आवश्यक असलेल्या सामग-ीचा पुरेसा पुरवठा राज्याने केला आहे. केंद्र सरकारचा हिस्सा म्हणून जिल्ह्यांना खतांचा पुरवठा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे,ङ्ग असे ते म्हणाले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!