मुख्य निवडणूक आयुक्त श्री सुशील चंद्रा यांनी उझबेकिस्तानच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीदरम्यान आंतरराष्ट्रीय निरीक्षक म्हणून दिली भेट
नवी दिल्ली,
उझबेकिस्तानच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अध्यक्षांनी, (उएउ-ण) दिलेल्या निमंत्रणावरून, भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त, श्री सुशील चंद्र यांनी 24 ऑक्टोबर 2021 रोजी उझबेकिस्तानात झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे निरीक्षक या नात्याने तीन सदस्यीय शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. उझबेकिस्तानच्या नवीन निवडणूक संहितेनुसार घेण्यात आलेल्या या निवडणुकीकडे सार्या आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष होते.
मुख्य निवडणूक आयुक्त, श्री सुशील चंद्र आणि उझबेकीस्तानच्या केंद्रीय निवडणूक आयोगाचे अध्यक्ष श्री झैनिद्दीन एम. निजामखोदजाएव यांच्यात 21 ऑक्टोबर 2021 रोजी निवडणूक सहकार्याबाबत द्विपक्षीय बैठक झाली. निजामखोदजाएव यांनी उझबेकिस्तानचे आमंत्रण स्वीकारल्याबद्दल श्री चंद्रा यांचे आभार मानले आणि त्यांना एकल इलेक्ट्रॉनिक मतदार यादी, मतदानाच्या दिवशी वैयक्तिक मतदानाची व्यवस्था आणि लवकर मतदान तसेच कोविड सुरक्षा व्यवस्थेसह या निवडणुकीच्या आयोजनासाठी केलेल्या उपाययोजना यासह विविध विषयांची माहिती दिली.
भारतात नुकत्याच झालेल्या निवडणुका,उझबेकिस्तानच्या निवडणूक अधिकार्?यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या निवडणूक सहकार्य, प्रशिक्षण आणि क्षमता निर्माण कार्यक्रमांवरील सामंजस्य करारावर स्वाक्षरी करून दोन्ही देशांमधील निवडणूक संबंध अधिक दृढ करण्यासाठी विविध मार्गांबद्दल श्री चंद्रा यांनी माहिती दिली.
भारतातील निवडणुकीदरम्यान आयोजित केलेल्या भारतीय निवडणूक आयोगाच्या आंतरराष्ट्रीय निवडणूक अभ्यागत कार्यक्रमांमध्ये (आयइव्हीपी) उझबेकिस्तानमधील प्रतिनिधी उत्साहाने सहभागी होत आहेत आणि उझबेकिस्तानमधील अधिकारी आयटीइसी कार्यक्रमांतर्गत भारतीय निवडणूक आयोगाच्या प्रशिक्षण कार्यक्रमांना उपस्थित राहिले आहेत. 14 जिल्हा निवडणूक आयोग आणि 10,760 स्थानिक निवडणूक आयोग यांचा समावेश असलेल्या त्रिस्तरीय संरचनेचे अनुसरण उझबेकिस्तानचा केंद्रीय निवडणूक आयोग प्रशासन करते.
उझबेकिस्तानच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या, निवडणूक प्रशासन, कार्यपद्धती आणि उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी भारतीय शिष्टमंडळाने 7 व्या आणि 14 व्या जिल्हा निवडणूक आयोगांना भेट दिली. त्यानंतर, त्यांनी निवडणूक प्रक्रियेचे तपशीलवार निरीक्षण करण्यासाठी उझबेकिस्तानमधील मतदान केंद्रांनाही भेट दिली.
सुशील चंद्र यांनी या भेटीत भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रीजी यांच्या ताश्कंद येथील स्मृतीस्थळावर पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.