’मोदी सत्तेतून जातीलही मात्र भाजप पुढील अनेक दशकांपर्यंत राजकारणात मजबूत राहील’, प्रशांत किशोर यांचं वक्तव्य
नवी दिल्ली,
निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. पुढील अनेक दशकांपर्यंत भारतीय राजकारणात भाजपचे वर्चस्व राहणार आहे. मोदी युग संपण्याची वाट पाहणे ही काँग-ेस नेते राहुल गांधी यांची चूक आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी हे भाजप मोदी लाट असेपर्यंत सत्तेत राहणार आहेत या भ-मात आहेत, असंही ते म्हणाले. मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवल्या आणि तरीही त्यांच्याविरोधात मोठा जनक्षोभही निर्माण झालेला नाही, असंही ते म्हणाले. राहुल गांधी आणि काँग-ेसनं वेळीच नरेंद्र मोदींची ताकद समजली पाहिजे. येत्या काही दशकांपर्यंत भाजपचं स्थान मजबूत असेल. शिवाय काही मुद्द्यांच्या आधारे नरेंद्र मोदींना सत्तेतून हटवू शकतो, असं मानणं ही चूक असू शकते, असा इशारा राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी दिलाय. पुढची आणखी काही वर्षे काँग-ेस आणि विरोधकांना भाजपविरोधात मोठा लढा द्यावा लागेल, असंही प्रशांत किशोर यांनी म्हटलं. गोव्यात तृणमूल काँग-ेससाठी काम करणार्या प्रशांत किशोर यांनी हा इशारा दिला.
प्रशांत किशोर गोव्यात एका कार्यक्रमात म्हणाले की, भाजप कुठेही जाणार नाही. भाजपा जिंकेल किंवा हरेल मात्र काँग-ेसच्या 40 वर्षांच्या कारभाराप्रमाणेच ते भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी राहतील. तुम्हाला भारतात 30 टक्के मते मिळाली की तुम्ही इतक्या लवकर कुठेही जाणार नाही. लोकं संतप्त होऊन मोदींना हटवून टाकतील या गैरसमजात पडू नका. लोक मोदींना हटवू शकतात, पण भाजप कुठंही जाणार नाही. पुढील अनेक दशकं तुम्हाला भाजपचा सामना करावा लागेल असंही ते म्हणाले.
त्यांनी म्हटलं की, राहुल गांधींची हीच अडचण आहे. बहुधा, त्यांना असे वाटते की ही फक्त थोड्या वेळेची बाब आहे, जोपर्यंत लोक मोदींना सत्तेवरून घालवत नाहीत तोपर्यंत. ते होणार नाही. जोपर्यंत तुम्ही मोदींची ताकत समजून घेत नाही आणि त्यांची ताकत स्वीकारत नाही, तोपर्यंत तुम्ही त्यांचा सामना करू शकणार नाही, असंही प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे. लोक मोदींची शक्ती समजून घेण्यास जास्त वेळ देत नाहीत, त्यांना समजत नाही की मोदी इतके लोकप्रिय कसे होत आहेत. जर तुम्हाला हे माहित असेल तरच तुम्ही त्यांचा सामना करू शकाल, असं प्रशांत किशोर म्हणाले.
प्रशांत किशोर म्हणाले की, तुम्ही काँग-ेसच्या कोणत्याही नेत्याकडे जा, ते तुम्हाला सांगतील ही थोड्या वेळेची गोष्ट आहे. ही काळाची बाब आहे, लोक कंटाळले आहेत, सत्ताविरोधी लाट येईल आणि लोक मोदींना हटवतील. मला शंका आहे, असे होणार नाही, असा दावाही त्यांनी केला.