नागपूरमधील नाग नदी पुनरुज्जीवन प्रकल्प
नवी दिल्ली,
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या नाग नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला खर्च वित्त समितीने (ईपीसी) मान्यता दिली आहे.
मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर आता 2,117 कोटी रुपयांचे हे काम प्रत्यक्षात सुरू होईल असे त्यांनी आपल्या टिवटर संदेशांमधे सांगितले. या कामासाठी आठ वर्षांचा कालावधी निश्चित करण्यात आला असून, या प्रकल्पांतर्गत 92 एमएलडी क्षमतेचे तीन एसटीपी प्रकल्प, 500 किमी सांडपाणी वाहून नेणार्या नाल्यांचे जाळे, पंपिंग स्टेशन आणि सामुदायिक शौचालये बांधण्यात येणार असल्याची माहिती श्री.गडकरी यांनी दिली.