घरगुती सिलेंडरच्या किंमतीचा भडका उडणार? पुढच्या आठवड्यात किंमती वाढण्याची शक्यता
नवी दिल्ली,
एकीकडे पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे जनता हैराण झाली असताना दुसरीकडे आता घरगुती सिलेंडरच्या किंमती वाढण्याची शक्यता असल्यामुळे सामान्यांचं कंबरडं मोडण्याची शक्यता आहे. पुढच्या आठवड्यात घरगुती सिलेंडरच्या किंमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. देशामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असल्यामुळे त्याचा परिणाम आता एलपीजी इंधनाच्या किंमतीवर होण्याची शक्यता आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्यांना मोठ्या तोट्यास सामोरं जावं लागत असल्याची माहिती आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढलेल्या किंमती लक्षात घेता एलपीजीच्या विक्रीवर 100 रुपये प्रति सिलेंडर नुकसान होत आहे. त्यावर सरकारकडून देण्यात येणारे अनुदानही बंद आहे. घरघुती सिलेंडरच्या किंमती किती प्रमाणात वाढवायच्या हे केंद्र सरकारच्या हातात आहे. या आधी 6 ऑॅक्टोबरला घरघुती सिलेंडरच्या किंमतीत 15 रुपयांची वाढ झाली होती. जुलैपासून विचार करता घरघुती सिलेंडरच्या किंमतीत आतापर्यंत 90 रुपयांची वाढ झाली आहे.
एक जानेवारीपासून आतापर्यंत आठ महिन्यांमध्ये सिलेंडच्या किमतींमध्ये 200 रुपयांहून अधिक वाढ झाली आहे. एक जानेवारी रोजी दिल्लीत घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 694 रुपये होती. आता दर वाढून 884.5 रुपयांवर पोहोचले आहेत. 2021 मध्ये फेब-ुवारी महिन्यात सिलेंडरचे दर वाढून 719 रुपये इतकी झाली आहे. त्यानंतर सिलेंडच्या किमती 15 फेब-ुवारी रोजी 769 रुपये, 25 फेब-ुवारी रोजी 794 रुपये, 1 मार्च रोजी 819 रुपये, 1 एप्रिल रोजी 809 रुपये, 1 जुलै रोजी 834.5 रुपये, 18 ऑॅगस्ट रोजी 859.5 रुपये इतक्या होत्या. त्यानंतर 6 ऑॅक्टोबरला घरघुती सिलेंडरच्या किंमतीत 15 रुपयांची वाढ झाली होती.
दरम्यान, तेल कंपन्यांनी दर महिन्याला एलपीजी सिलेंडरच्या किमतींची समिक्षा करतात. त्यानंतर किमती वाढवणं किंवा किंमतींमध्ये घट करणं यासंदर्भात निर्णय घेण्यात येतो. प्रत्येक राज्यात कर वेगवेगळा असतो. याच कारणामुळे गॅसच्या किमतींमध्ये चढ-उतार पाहायला मिळतो. सध्या केंद्र सरकार एका वर्षात ग-ाहकांना 12 घरगुती गॅस सिलेंडरवर अनुदान देतं. जर एखादा ग-ाहक याहून अधिक वापर करत असेल तर त्याला बाजारभावाने खरेदी करावी लागते.