केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी राष्ट्रीय पातळीवरील जागरूकता कार्यक्रम, 2021 ‘संभव‘ चा केला प्रारंभ

नवी दिल्ली,

केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री (एमएसएमई) नारायण राणे यांनी देशाला आर्थिक विकासाकडे नेणार्‍या उद्योजकतेला चालना देण्यासाठी तरुणांना सहभागी करून घेण्याचे आवाहन केले आहे. नवी दिल्ली येथे भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयातर्फे आज आयोजित राष्ट्रीय पातळीवरील जागरुकता कार्यक्रम-2021 फसंभवङ्ग चा त्यांनी प्रारंभ केला. बंधित व्यवसाय किंवा क्षेत्रांना चालना देण्यासाठी नवोदित उद्योजकांनी तयार केलेली नवीन उत्पादने आणि सेवा एक लाभदायी परिणाम देऊ शकतात यावर भर त्यांनी दिला. मंत्री महोदयांसमवेत राज्यमंत्री श्री भानु प्रताप सिंग वर्मा आणि एमएसएमईचे सचिव श्री बी बी स्वेन उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री भानू प्रताप सिंग वर्मा यांनी स्थूल राष्ट्रीय उत्पादन, जीडीपी सध्याच्या 30 टक्क्यांवरून 50 टक्क्यांपर्यंत वाढवणे आणि एमएसएमई क्षेत्रातील रोजगार निर्मिती 11 कोटींवरून 15 कोटींवर नेणे यावर भर दिला. भविष्यात भारत ही जगातील आघाडीची अर्थव्यवस्था होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

एमएसएमई मंत्रालया अंतर्गत लोकांपर्यत पोहोचण्याचा हा कार्यक्रम एक महिना चालणारा उपक्रम आहे. ज्यामध्ये देशाच्या सर्व भागातील विविध महाविद्यालयेआयटीआय (तंत्रशिक्षण संस्था) मधील विद्यार्थ्यांना मंत्रालयाच्या 130 क्षेत्रीय कार्यालयांद्वारे उद्योजकतेसाठी प्रोत्साहित केले जाईल. मोहिमेदरम्यान एमएसएमई मंत्रालयामार्फत राबवण्यात येत असलेल्या विविध योजनांची दृक् श्राव्य चित्रफितींच्या सादरीकरणाद्वारे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना माहिती देवून त्याबद्दल जागृती केली जाईल.

देशभरातील 1,300 हून अधिक महाविद्यालयांमध्ये हे जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जातील. यात 1,50,000 विद्यार्थी सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!