गुप्त अधिकारी नौदलाच्या अधिकार्‍याला सीबीआयकडून अटक; हेरगिरीचे आरोप

नवी दिल्ली,

सीबीआयने किलो पाणबुडीच्या आधुनिकीकरणाशी संबंधित गुप्त तांत्रिक माहिती उघड केल्याप्रकरणी एका नौदल कमांडर अधिकार्‍यासह दोन निवृत्त अधिकारी आणि इतर दोघांना अटक केली आहे. उच्च सरकारी सूत्रांनी ही माहिती दिली. नौदलाची माहिती लीक होण्यापासून रोखण्यासाठी आणि भविष्यात अशा घटना होऊ नये, यासाठी व्हाइस अ‍ॅडमिरल आणि रिअर अ‍ॅडमिरल यांच्या नेतृत्वाखाली पाच सदस्यीय तपास पथकही तयार केले.

संबंधित यंत्रणांकडून माहिती मिळाल्यानंतर सीबीआयने मुंबईत तैनात असलेल्या कमांडरला अटक केली. त्यांनी ही अनधिकृत माहिती निवृत्त अधिकार्‍यांना लीक केली होती. अटक केलेल्या अधिकार्‍यांच्या संपर्कात असलेल्या इतर अनेक उपस्थित अधिकार्‍यांचीही सीबीआय चौकशी करत आहे. केंद्रीय एजन्सीद्वारे करण्यात येत असलेल्या तपासाला नौदल मदत करत आहे. तपास यंत्रणेने गेल्या महिन्यात गुप्त कारवाई केली होती. या कारवाईत नौदलाचे दोन निवृत्त अधिकारी, एक कार्यरत अधिकारी आणि अन्य दोन जणांना ताब्यात घेण्यात आले होते. जन्सीने आतापर्यंत दिल्ली, मुंबई, हैदराबादमध्ये या प्रकरणाचा तपास केल्याचे सुत्रांनी सांगितले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!