टेस्ला कंपनीचे सीईओ एलन मस्क यांच्या संपत्तीत विक्रमी वाढ

नवी दिल्ली,

हेटर्ज ग्लोबल होल्डिंगने एका दिवसात दिलेल्या 1 लाख इलेक्ट्रिक कारच्या ऑॅर्डरमुळे अमेरिकेची प्रसिद्ध इलेक्ट्रिक कार उत्पादन करणारी टेस्ला कंपनीचे सीईओ एलन मस्क यांच्या संपत्तीत विक्रमी वाढ झाली आहे. कंपनीचा शेअर सोमवारी 14.9 टक्के म्हणजे 1 हजार 45 डॉलरवर पोहचल्यामुळे टेस्ला कंपनीतील 23 टक्के शेअरची किंमत आता 289 अब्ज डॉलर झाली आहे.

याबाबत ब्लूमबर्ग बिलियनेअर्सच्या इंडेक्सनुसार एका दिवसात एलन मस्क यांच्या संपत्तीत झालेली वाढ ही जगातील पहिलीच घटना आहे. 36 अब्ज डॉलरची म्हणजे 2 लाख 71 हजार डॉलरची वाढ सोमवारच्या एका दिवसात झाली आहे. चीनमधील बाटलीबंद पाणी विक्री करणारी नोंगफ्रू स्फ्रिंग कंपनीचे मालक झोंग शानशान यांच्या संपत्तीत मागील वर्षात 32 बिलियन डॉलरची वाढ झाली होती.

एलन मस्क यांच्या संपत्तीत 2021 वर्षाच्या सुरुवातीला 119 अब्ज डॉलची वाढ झाली होती. एका दिवसात एलन मस्क यांच्या संपत्तीत झालेल्या वाढीमुळे त्यांच्या टेस्ला कंपनीचे बाजारमुल्य आता 3 ट्रिलियन झाले आहे. त्यासंदर्भात एलन मस्क यांनी टिवट करत माहिती दिली आहे. दरम्यान, टेस्ला कंपनीसह रॉकेट उत्पादन कंपनी स्पेस एक्सचे देखील एलन मस्क सीईओ आणि भागधारक आहे. या कंपनीची किंमत ऑॅक्टोबर महिन्याच्या काळात 100 अब्ज डॉलरच्या घरात गेली आहे. त्यामुळे एलन मस्क यांची वैयक्तिक संपत्ती 288.6 अब्ज डॉलर एवढी प्रंचड झाली आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!