स्वातंत्र्यानंतर अल्पसंख्याक मताचे राजकीय सौदागरांनी या समुदायाचे फक्त शोषणच केले: मुख्तार अब्बास नकवी

नवी दिल्ली,

केंद्रीय अल्पसंख्याक कार्य मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी भारतीय जनता पक्षाला खर्‍या अर्थात राष्ट्रीय पक्ष ठरऊन काँग्रेसला नॉन परफामिर्ंग राजकीय पक्ष सांगितले. विरोधीी पक्षावर स्वातंत्र्यानंतर अल्पसंख्याक समुदायाचे शोषण करण्याचा आरोप लाऊन केंद्रीय मंत्रींनी सांगितले की स्वातंत्र्याच्या 75 वर्षामध्ये अल्पसंख्याक मताचे राजकीय सौदागरांनी अल्पसंख्याकच्या शोषणाची 75 बुद्धीबळ चाल चालली. नवी दिल्लीमध्ये भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला संबोधित करून केंद्रीय मंत्रींनी देशाच्या मुस्लिम समाजासाठी उचललेल्या पाऊलाचा उल्लेख करताना सांगितले की मोदी सरकारचे साडे 7 वर्षाच्या कार्यकाळामध्ये देशात सकारात्मक वातावरण बनले  आहे आणि देशाला दंगलीने मुक्ती मिळाली आहे.

कोरोना काळात मोदी सरकारद्वारे चांगले काम करण्याचा दावा करताना नकवी यांनी देशभरातून आलेले पक्ष अल्पसंख्याक मोर्चाचे सर्व पदाधिकारींना आव्हन केले की त्यांनी अल्पसंख्याक समुदायाच्या लोकांकडे जावे आणि त्यांना सांगावे की सरकारच्या विभिन्न योजनांनी अल्पसंख्याक समुदायाच्या लोकांना किती लाभ झाला आहे.

कश्मीरच्या स्थितीचा उल्लेख करताना केंद्रीय मंत्रींनी सांगितले की तेथे हिंसा आणि हत्या करणार्‍यांना निवडून शिक्षा दिली जात आहे. तसेच त्यांनी हा ही दावा केला की कलम 370 हटवल्यानंतर तेथे जो बदल आला आहे, ते पूर्वी देखील येऊ शकत होते परंतु येथे राज करणार्‍या लोकांची अशी इच्छा नव्हती.

इस्लामिक देशात मागील साडे 7 वर्षामध्ये सतत वाढणारे भारताच्या प्रभावाचा उल्लेख करताना मुख्तार अब्बास नकवी यांनी सांगितले की 2019 मध्ये इंडोनेशियानंतर सर्वात जाास्त हजचा कोटा भारताला मिळाला. अनेक मुस्लिम देशांनी आपल्या सर्वोच्च सन्मानाने पंतप्रधान मोदी यांना सन्मानित केले.

देशाची राजधानी दिल्लीमध्ये भाजपा अल्पसंख्याक मोर्चाच्या एक दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत येणारे 5 राज्यांचे विधानसभा निवडणुकच्या दृष्टीकोणाने अल्पसंख्याक मतदारांना विशेषत: मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्याच्या धोरणाला अंतिम रूप दिलेल जाणार आहे. बैठकीत देशाचे राजकीय वातावरणावरून एक राजकीय प्रस्तावालाही पारित केले गेले.

कार्यकारिणीच्या बैठकीत अल्पसंख्याक मोर्चाच्या वेबसाइटलाही लाँच केले गेले. येणार्‍या दिवसात मोर्चाचे सर्व कार्यकर्त्यांना सोशल मीडियापासून जमीनी धरातलापर्यंत आपल्या सक्रियता वाढवण्यास सांगण्यात आले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!