फोनपे यूजर्सला झटका : फोनपे ने सुरू केले ट्रांजेक्शन चार्ज
नवी दिल्ली,
फोनपे चा वापर करणार्यांना आता मोबाईल रिचार्जवर प्रोसेसिंग फी भरावी लागणार आहे. युपीआई (युनिफाइड पेमेंट इंटरफेस) व्यवहारांवर हा नियम वॉलमार्ट ग-ुपची डिजिटल पेमेंट कंपनी फोनपे ने लागू केला आहे. 50 ते 100 रुपयांच्या रिचार्जवर वापरकर्त्यांना प्रति व्यवहार 1 रुपये आणि 100 रुपयांपेक्षा अधिकच्या रिचार्जवर 2 रुपये द्यावे लागतील. अशाप्रकारे, फोनपे युपेअई आधारित व्यवहारांवर शुल्क आकारणारे पहिले डिजिटल पेमेंट अॅप बनले आहे.
कंपनीच्या प्रवक्त्याने बिल पेमेंटवरील शुल्काबाबत सांगितले की, असे करणारे आम्ही उद्योगातील पहिले नाही. सर्व डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म बिल भरण्यासाठी शुल्क आकारत आहेत. जर क्रेडिट कार्डच्या मदतीने बिल भरले असेल, तर आम्ही त्यासाठी प्रक्रिया शुल्क आकारतो. इतर प्लॅटफॉर्मकडून हे सुविधा शुल्क म्हणून आकारले जाते.
थर्ट पार्टी म्हणून अॅपमध्ये युपेआई व्यवहारांच्या बाबतीत फोनपे चा सर्वात मोठा वाटा आहे. सप्टेंबरमध्ये कंपनीच्या प्लॅटफॉर्मवर 165 कोटींपेक्षा जास्त युपेआई व्यवहार झाल्यामुळे अॅप विभागातील त्यांचा बाजारातील हिस्सा सुमारे 40म झाला आहे. फोनपे ला जीवन विमा आणि सामान्य विमा उत्पादने विकण्यासाठी विमा नियामक (खठऊअख) कडून देखील मान्यता मिळाली आहे. आता येत्या काळात कंपनी आपल्या 300 दशलक्षाहून अधिक वापरकर्त्यांना विमा-संबंधित सल्ला देऊ शकते. यासह फोनपे भारतातील सर्व विमा कंपन्यांच्या पॉलिसी विकण्यास सक्षम असेल.