टिवटर करतोय उजव्या विचारांच्या टिवटर हॅडल्सला प्रमोट; संशोधनातून माहिती आली समोर
नवी दिल्ली,
जगभरात सध्या टिवटरचा मोठ्या प्रमाणात वापर वाढत असून त्यावर विविध अतिमहत्त्वाच्या व्यक्ती, सिनेसृष्टीतले सेलिबि-टी आणि इतर क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश आहे. मागच्या काही काळापासून लोक फेसबुकपेक्षा टिवटरचा वापर जास्त प्रमाणात करू लागल्याने टिवटर या अॅपची लोकप्रियता चांगलीच वाढली आहे. परंतु आता टिवटर जगभरातील उजव्या विचारांच्या लोकांच्या टिवटर हॅडल्सला अधिक रिच देत असल्याची धक्कादायक माहिती एका सर्वेक्षणातून समोर आली आहे. त्यामुळं आता टिवटरच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्हं उपस्थित होत आहे.
हे संशोधन करणार्या टीमचं म्हणणं आहे की टिवटरचा अश्रसेीळींहा हा विशिष्ट पद्धतीने सेट करण्यात आला असून ज्यात उजव्या विचारांच्या लोकांच्या टिवटसला प्राधान्य दिलं जात आहे. त्याचबरोबर हे प्रकरण फक्त एखाद्या देशापुरतं मर्यादित नसून ते जगभरात घडत असल्याचीही माहिती संशोधनकर्त्यांनी दिली आहे.
त्यात उजव्या विचारांचे लोक आणि उजव्या विचारांच्या पक्षांच्या टिवटला टिवटरने सेट केलेल्या अश्रसेीळींहा मुळं अधिक लोकांपर्यंत पोहचवण्यात येत आहे. त्याचबरोबर उजव्या विचारांच्या टिवटर हँडल्सच्या तुलनेत डाव्या किंवा इतर विचारांच्या टिवटर हँडल्सना तेवढा रिच मिळत नाही, अशीही माहिती या संशोधनातून समोर आली आहे.
रिसर्च करणार्या या कंपनीनं जगातील सात देशांमध्ये याबाबत सर्वेक्षण केलं असून त्यात कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, जपान, स्पेन, बि-टन आणि अमेरिकेचा समावेश आहे. त्यात 1 एप्रिल 2020 पासून तर 15 ऑॅगस्ट पर्यंतच्या टिवटरवरील टिवटसचं सर्वेक्षण करण्यात आलं होतं. त्यात टिवटर सातत्यानं उजव्या विचारांच्या लोकांच्या टवीटसला प्रमोट करत असल्याची माहिती समोर आली आहे.
टिवटरच्या मेटा टीमचे निर्देशक रुम्मन चौधरी यांनी याविषयी बोलताना म्हटलं आहे की आम्हाला माहिती मिळाली आहे की डाव्या विचारांच्या टिवटर हँडल्सपेक्षा उजव्या विचारांच्या हँडल्सला अधिक रिच मिळत आहे. पंरतु टिवटर एक तंत्रज्ञान प्रणाली असल्याने कदाचित त्याच्या अत्ुदीग्ूप्स् सिस्टममुळं हे प्रकार घडत असतील. त्यामुळं आता आम्ही त्यावर काम करत आहोत.
काही दिवसांपूर्वी टिवटर कंपनी आणि भारत सरकारमधील फेक न्यूजवरून सुरू झालेला वाद विकोपाला गेला होता. त्यानंतर आता टिवटरवर पुन्हा हे आरोप लागत असल्यानं टिवटरच्या विश्वासार्हतेवर प्रश्वचिन्हं उपस्थित केलं जात आहे.