देशातील कोरोना मृतांची संख्या चिंताजनक, गेल्या 24 तासात 666 जणांचा मृत्यू
नवी दिल्ली
देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित (ण्दन्ग्-19) रुग्णांच्या घट होताना दिसत आहे. परंतु, कोरोनामुळे मरण पावलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ सुरूच आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासात 16 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर, 666 जणांचा मृत्यू झाला आहे. ही अतिशय चिंताजनक बाब आहे. देशातील कोरोनाची सध्याची परिस्थिती जाणून घेण्यासाठी खालील माहिती उपयोगी ठरणार आहे.
देशात गेल्या 24 तासात 16 हजार 326 रुग्ण आढळून आले आहेत. तर, 666 जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे कोरोनामुळे मरण पावलेल्या रुग्णांची एकूण संख्या 4 लाख 53 हजार 708 वर पोहचली आहे. चिंताजनक बाब म्हणजे, देशात कोरोनामुळे मरण पावलेल्या रुग्णांपैकी 563 मृत्यू केरळ राज्यातील आहेत.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मते, सध्या देशात एकूण 1 लाख 73 हजार 728 रुग्ण संक्रमित आहेत. देशात आतापर्यंत 3 कोटी 35 लाख 32 हजार 126 जणांनी कोरोनावर मात केली आहे. देशात लसीकरणाच्या मोहिमेलाही वेग आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात काल 68 लाख 48 हजार 417 जणांना लस देण्यात आली आहे. ज्यामुळे देशातील लसीकरणाची संख्या 1,01,30,28,411 वर पोहचली आहे.