पेट्रोल-डिझेल दरवाढ सुरुच, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
नवी दिल्ली
एकीकडे कोरोना महामारीच्या संकटामुळे हैराण झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल-डिझेल दरवाढीची झळ बसत आहे. लागोपाठ चौथ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत वाढ झाली आहे. शनिवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये प्रति लीटर 35 पैशांनी वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत प्रतिलीटर 107.24 रुपये इतकी झाली आहे. तर डिझेल 95.97 रुपयांवर पोहचलं आहे. आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईनेही पेट्रोल-डिझेल दरवाढीचा उच्चांक गाठला आहे. मुंबईमध्ये पेट्रोल प्रतिलीटर 113.12 रुपये झालं आहे तर डिझेल प्रतिलीटर 104.00 रुपयांवर पोहचलं आहे. देशातील सर्व मोठ्या महानगरांपैकी पेट्रोल-डिझेलच्या सर्वाधिक किमती मुंबईत आहेत. तर कोलकाता आणि चेन्नईमध्ये पेट्रोलच्या किंमती क्रमश: 107.78 रुपये प्रति लिटर आणि 104.22 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 99.08 रुपये प्रति लिटर आणि 100.25 रुपये प्रति लिटर आहे.
20 दिवसांत प्रतिलीटर 6.05 रुपयांनी महागलं पेट्रोल –
ऑॅक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका सुरु झाला होता. मागील 20 दिवसांपासून देशात पेट्रोल जवळपास प्रतिलीटर 6.05 रुपयांनी महागलं आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये सतत वाढ होत असल्यामुळे इंधन दरवाढ होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रुड ऑॅईलची किंमत प्रति बॅरल 85 डॉलरपर्यंत पोहचली आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून इंधन दरवाढ सुरु आहे.
23 दिवसांत प्रतिलीटर 7.35 रुपयांनी महागलं डिझेल –
मागील काही दिवसांपासून डिझेलच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. अनेक राज्यात डिझेलनं शंभरी पार केली आहे. मागील 23 दिवसांपासून देशात डिझेल प्रतिलीटर 7.35 रुपयांनी महागलं आहे.
शहराचं नाव पेट्रोल रुपयेलीटर डिझेल रुपयेलीटर
दिल्ली 107.24 95.97
मुंबई 113.12 104.00
चेन्नई 104.22 100.25
कोलकाता 107.78 99.08
भोपाळ 115.90 105.27
रांची 101.56 101.27
बेंगळुरु 110.98 101.86
पाटना 110.84 102.57
चंदीग़ढ 103.21 95.68
लखनौ 104.20 96.42
नोएडा 104.42 96.62