गाझीपुर सीमेवरील अनेक महिन्यां पासून बंद रस्त्याला उघडण्याचा शेतकर्‍यांचा प्रयत्न

नवी दिल्ली

केंद्रिय कृषी कायद्यांच्या विरोधात सुरु असलेल्या विरोध प्रदर्शनामुळे दिल्लीला लागून असलेल्या गाझीपुर सीमेवरील रस्ता मागील दहा महिन्यां पासून बंद आहे. तर दुसरीकडे गुरुवारी शेतकर्‍यांनी गाझाीपुर सीमेवरील सर्व्हिस लेन उघडण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. शेतकर्‍यांच्या मते रस्ता शेतकर्‍यांनी बंद केलेला नाही तर पोलिसांनी बंद केला आहे.

भारतीय किसान यूनियन (बीकेयू) शी संबंधीत शेतकरी आज गाझीपुर सीमेवर लावलेल्या बॅरिकेड पर्यंत पोहचले व रस्त्यावर उभारलेल्या तंबूना हटविण्यास सुरुवात केली.

शेतकर्‍यांच्या मते सर्वोच्च न्यायालयात शेतकर्‍यां बाबत चूकीची माहिती दिली जात आहे. आम्ही रस्ता कधीही बंद केला नव्हता आणि आम्ही तर दिल्लीला जाऊ इच्छित आहोत. पोलिस आम्हांला सीमेच्या पलिके जाऊ देत नाही.

शेतकर्‍यांनी सीमेवर उभारलेल्या मीडिया सेंटरला रस्त्यावरुन हटविले आहे तसेच त्यांनी आपल्या गाडयांना पोलिसांच्या बॅरिकेटच्या जवळ उभ्या केले आहेत.

दुसरीकडे सिंधू सीमेवर संयुक्त शेतकरी मोर्चाची बैठक सुरु असून यात रस्त्यांना उघडण्या बाबत निर्णय घेतला जाऊ शकतो.

दरम्यान गाझीपुर सीमेवर मागील 11 महिन्यां पासून केंद्रिय कृषी कायद्यांना माघारी घेणे आणि आधारभूत समर्थन किंमती बाबत कायदा बनविण्याची हमीची मागणी करत शेतकरी आंदोलन करत आहेत.

शेतकरी आंदोलनामुळे गाझीयाबादहून दिल्लीकडे जाणारा दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवे पूर्णपणे बंद आहे यामुळे रोज लाखो लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सर्वोच्च न्यायालयात रस्ता बंद होण्यावर सुनवाई झाली असून न्यायालयानेही वेळोवेळी रस्ता मार्ग बंद होण्यावर चिंता व्यक्त केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मात्र शेतकरी संघटनाना या मुद्दावर तीन आठवडयांच्या आतमध्ये उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आणि प्रकरणाची सुनवाई 7 डिसेंबरला सूचिबध्द केली.

सर्वोच्च न्यायालय नोएडा निवासीच्या याचिकेवर सुनवाई करत होते. या याचिकेत सांगण्यात आले की शेतकरी आंदोलनाच्या कारणामुळे रस्ता बंद झाल्याने वाहतुकीला अडचण होत आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!