शंभर कोटी लसीकरणाचे श्रेय सरकारला द्यावे – थरुर

नवी दिल्ली,

भारताने गुरुवारी 100 कोटी लसचा एक मोठा टप्पा पूर्ण केला असून यानंतर काँग-ेसचे लोकसभेतील खासदार शशि थरुर यांनी म्हटले की याचे श्रेय सरकारला दिले गेले पाहिजे आणि हे पूर्ण देशासाठी गर्वाची गोष्ट आहे.

शशि थरुर यांनी टिवीट करुन म्हटले की हे सर्व भारतीयांसाठी गर्वाची गोष्ट आहे आणि याचे श्रेय सरकारला द्यावे. कोविडच्या दुसर्‍या लाटेतील गंभीर कुव्यवस्थान आणि लसीकरणातील गडबड, ज्याला रोखले जाऊ शकले असते. सरकारने आता आंशिकपणे स्वत:ला संभाळले आहे. सरकार आपल्या पूर्वीच्या अपयशाच्या प्रति अजूनही उत्तरदायी आहे.

कोविन पोर्टलने गुरुवारी उल्लेख केला की भारतामध्ये लसीकरण अभियाना अंतर्गत पात्र लोकसंख्येला आता पर्यंत 100 कोटी लसचे डोज दिले गेले आहेत.

कोविड महामारीच्या विरुध्द भारतामध्ये लसीकरण अभियानाची 16 जानेवारी 2021 ला सुरुवात करण्यात आली होती. आरोग्य कार्यकर्त्यांना सर्वांत प्रथम लसीचे डोज दिले होते. नंतर 2 फेब-ुवारी पासून फ्रंटलाईन वर्कर्सना अभियानात सामिल करण्यात आले होते. लसीकरण अभियानात राज्य आणि केंद्रीय पोलिस कर्मचारी, सशस्त्र दल, होमगार्ड, नागरीक सुरक्षा आणि अन्य जणांना सामिल करण्यात आले.

लसीकरण अभियानाचा विस्तार 1 मार्च पासून करण्यात आला होता आणि यात 60 वर्षापेक्षा अधिक वयोगटातील लोकांना आणि आधी पासून अजारी असलेल्या 45 वर्षापेक्षा अधिक वयोगटातील लोकांना सामिल करण्यात आले होते. 1 मे पासून लसीकरण  अभियान 18 वर्षापेक्षा अधिक वयोगटातील लोकांसाठी सुरु करण्यात आले होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!