कोविड – 19 बाबत अद्ययावत माहिती
नवी दिल्ली 20 OCT 2021
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 99.12 कोटी लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत
गेल्या 24 तासात 14,623 नवीन रुग्णांची नोंद झाली
सध्या रुग्ण बरे होण्याचा दर 98.15%; मार्च 2020 पासून सर्वाधिक दर
गेल्या 24 तासात 19,446 रुग्ण बरे झाले, एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढून 3,34,78,247
उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण रुग्णसंख्येच्या 1% पेक्षा कमी आहे, सध्या त्याचे प्रमाण 0.52% आहे; मार्च 2020 पासून सर्वात कमी
भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 1,78,098 आहे, 229 दिवसातील ही सर्वात कमी संख्या आहे.
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (1.34%) गेले 117 दिवस 3 % पेक्षा कमी
दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (1.10%) गेले 51 दिवस 3% पेक्षा कमी
आतापर्यंत एकूण 59.44 कोटी चाचण्या करण्यात आल्या.