पंतप्रधान 20 ऑॅक्टोबर रोजी जागतिक तेल आणि वायू क्षेत्रातील सीईओ आणि तज्ञांशी साधणार संवाद
नवी दिल्ली,
पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 ऑॅक्टोबर, 2021 रोजी संध्याकाळी 6 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जागतिक तेल आणि वायू क्षेत्रातील मुख्य कार्यकारी अधिकारी आणि तज्ञांशी संवाद साधणार आहेत. 2016 मध्ये सुरू झालेल्या या उपक्रमाचा हा सहावा वार्षिक संवाद आहे. या क्षेत्रातील महत्वाच्या मुद्द्यांवर विचारविनिमय करणारे तेल आणि वायू क्षेत्रातील जागतिक नेते यात सहभागी होतात, भारताबरोबर सहकार्य आणि गुंतवणूकीच्या संभाव्य क्षेत्रांचा ते शोध घेतात.
स्वच्छ वाढ आणि शाश्वततेला प्रोत्साहन आहे ही आगामी संवादाची व्यापक संकल्पना आहे. परस्परसंवाद, भारतातील हायड्रोकार्बन क्षेत्रातील अन्वेषण आणि उत्पादनाला प्रोत्साहन देणे, ऊर्जा स्वातंत्र्य, वायू आधारित अर्थव्यवस्था, कमी उत्सर्जन- स्वच्छ आणि ऊर्जा कार्यक्षम उपायांद्वारे, हरित हायड्रोजन अर्थव्यवस्था, जैवइंधनाचे उत्पादन वाढवणे आणि टाकाऊतून संपत्तीनिर्मिती यासारख्या क्षेत्रांवर संवादात लक्ष केंद्रित केले जाणार आहे. या विचारांच्या देवाणघेवाणीत आघाडीच्या बहुराष्ट्रीय संस्था आणि आंतरराष्ट्रीय संस्थाचे सीईओ आणि तज्ञ सहभागी होणार आहेत.
यावेळी केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री उपस्थित राहणार आहेत.