सोन्याच्या दरात अंशत: वाढ; चांदी प्रति किलो 323 रुपयांनी महाग
नवी दिल्ली,
सोन्याच्या दरात नवी दिल्लीत प्रति तोळा 37 रुपयांनी वाढ झाली आहे. या दरवाढीनंतर दिल्लीत सोन्याचा दर प्रति तोळा 46,306 रुपये असल्याची माहिती एचडीएफसीने दिली आहे. मागील सत्रात सोन्याचा दर प्रति तोळा 46,269 रुपये होता.
चांदीच्या दरात प्रति किलो 323 रुपयांची वाढ झाली आहे. चांदीचा दर प्रति किलो 62,328 रुपये आहे. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो 62,005 रुपये होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात किंचित घसरण झाली आहे. सोन्याचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात प्रति औंस 1,766 डॉलर आहे. तर चांदीचे दर स्थिर राहून प्रति औंस 23.36 डॉलर आहेत.
सोन्याच्या किमतीवर सोमवारी राहिला दबाव-
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विेषक तपान पटेल म्हणाले, की कोमेक्स ट्रेडिंगमध्ये सोन्याच्या किमती अंशत: घसरून 1,766 डॉलर राहिल्या आहेत. रुपयाच्या तुलनेत वधारलेला डॉलर आणि जागतिक बाजारातील संमिश्र स्थिती या कारणांनी सोन्याच्या किमतीवर सोमवारी दबाव राहिल्याचे पटेल यांनी सांगितले.
सोने व चांदीचे दर कमी झाल्याने दिलासा-
जागतिक बाजारपेठ अस्थिर आहे. त्यामुळे सोने व चांदी या धातूंचे दर सातत्याने कमी-जास्त होत आहेत. सद्यस्थितीत सोने व चांदीचे दर काही प्रमाणात कमी झाल्याने ग-ाहक खरेदीसाठी पुढे येत आहेत. दसर्याच्या मुहूर्तावर सोने व चांदी खरेदी शुभ मानली जाते. त्यामुळेअनेकांनी दसर्यादिवशी आपल्या बजेटनुसार सोने-चांदी खरेदी केली आहे. त्यामुळेच जळगावातील सुवर्ण बाजाराची घडी हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचे चित्र आहे.