पेट्रोल-डिझेलचे आजचे दर माहितीयेत का? देशातील सर्वच शहरांत गाठलाय उच्चांक
नवी दिल्ली
भारतीय तेल कंपन्यानी आजसाठी इंधनाचे नवे दर जारी केले आहेत. आज (सोमवार) पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सातत्यानं वाढणार्या पेट्रोल-डिझेलच्या दर आज स्थिर असल्यामुळे काहिसा का होईना सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. इंडियन ऑॅइल कॉर्पोरेशन लिमिटेडनं दिलेल्या माहितीनुसार, सलग 4 दिवस 35-35 पैशांच्या वाढीनंतर 18 ऑॅक्टोबर रोजी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. देशाची राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल 105.84 रुपये प्रति लिटरवर पोहोचलं असून डिझेल 94.57 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. देशभरात पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी उच्चांक गाठला आहे.
पेट्रोलियम मार्केटिंग कंपनी इंडियन ऑॅईल कॉर्पोरेशननं दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत डिझेलनंही उच्चांक गाठला आहे. आज म्हणजेच, 18 ऑॅक्टोबर रोजी मुंबईत डिझेल 102.52 रुपये प्रति लिटर आणि पेट्रोल 111.17 रुपये प्रति लिटरवर पोहोचलं आहे.
आठवडाभरात कितीनं महागलं पेट्रोल-डिझेल?
गेल्या आठवड्यात पेट्रोलच्या दरांत 1.70 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर डिझेलची किंमत 1.75 रुपये प्रति लिटरनं वाढली आहे. सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर ब-ेंट कच्चं तेल 84.8 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचलं आहे. ब-ेंट कच्चं तेल सात वर्षांनी पहिल्यांदाच एवढं महाग झालं आहे.