कोरोना काळाने तंत्रज्ञान आणि मुलभूत आराखड्याचे महत्व शिकवले : केंद्रीय शिक्षणमंत्री

नवी दिल्ली,

कोरोना महामारीदरम्यान शिक्षणात तंत्रज्ञानाच्या उपयोगाचे नवीन रूप समोर आले. उच्च शिक्षण संस्थेपासून शाळांपर्यंत सर्व वर्गाला शिक्षण डिजिटल माध्यमावर अवलंबूून व्हावे लागले. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान  यांचे मत आहे की कोरोना महामारीने जगभरात टेक्नोलॉजीच्या महत्वाला शिकवले.

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ’उच्च शिक्षण – कोरोनासोबत, कोरोनानंतर’ विषयावर बोलताना सांगितले, कोरोनाच्या काळाने जगाला तंत्रज्ञान आणि मुलभुत आराखड्याचे महत्व शिकवले. या आव्हनाने संपूर्ण जगाला विघटनकारी स्थितीत आणून उभे केले होते. या कठीण काळाने भारताला संभाळण्यात आमच्या लोकांची सामुहिक इच्छा शक्ती, ज्ञान आणि संशोधनाच्या शक्तीने मोठी भूमिका निभावली आहे.

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले की आज जेव्हा आम्ही स्वातंत्र्याचे 75 वे वर्षाचे अमृत महोत्सव मनवत आहोत तर कोरोना संकटाच्या व्यतिरिक्त औद्योगिक क्रांती 4.0 देखील जगात तेजीने प्रसार करत आहे. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 भूत आणि वर्तमानच्या या अनुभवाने शिकताना आमच्या तरूणांना भविष्याच्या गरजेसाठी तयार करण्याकडे महत्वपूर्ण आणि मोठी पहल आहे.

शिक्षणमंत्रींनी सांगितले की सरकारचा प्रयत्न असे इकोसिस्टमची निर्मिती करणार आहे ज्यात भारताच्या तरूणांना शिक्षित करण्यासह त्यांना रोजगाराचे पात्र बनवले जाऊ शकेल. त्यांनी सांगितले की आमच्या तरूणांचे ज्ञान आणि कौशल्यच भारतात उत्पादन, निर्माण आणि संशोधनाला प्रेरणा देऊन आत्मनिर्भर भारत निर्माणला तेज गती देणारे इंधन बनेल.

इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र, दिल्लीमध्ये शिक्षण संस्कृती उत्थान न्यासद्वारे एक कार्यक्रम आयोजित केला गेला. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ही गोष्ट म्हटली. त्यांनी ’उच्च शिक्षण – कोरोनासह, कोरोनानंतर’ विषयावर आपले संबोधन दिले. यादरम्यान त्यांनी या कठिन काळाची शिकवण आणि अनुभवावरून मजबूतीने पुढे वाढण्यावर विस्तृत चर्चा केली.

शिक्षणमंत्री म्हणाले की हे एक दिवसीय गोष्ठी, आजच्या गरजेच्या अनुरूप पाठ्यक्रमात सुधारणा, कौशल विकासाचा प्रसार, गुणवत्ता आणि तंत्रज्ञान युक्त शिक्षणासह कोरोना काळ खंडचे आंकलन व मूल्यांकनावर चर्चा करेल आणि त्या अनुभवाच्या आधारावर भविष्याचे धोरण तयार करण्यात मदत करेल.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!