पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र
नवी दिल्ली
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत, लसींच्या 12,05,162 मात्रा देण्यात आल्यामुळे, भारताच्या कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रांच्या एकूण संख्येने 97.79 कोटी मात्रांचा (97,79,47,783) टप्पा पार केला आहे. देशभरात 96,88,300 सत्रांच्या आयोजनातून हे लसीकरण साध्य करण्यात आले आहे.
गेल्या 24 तासांत 19,582 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे देशात (महामारीची सुरुवात झाल्यापासून) आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बर्या झालेल्या रुग्णांची संख्या 3,34,39,331 झाली आहे. परिणामी, सध्या देशातील रोगमुक्ती दर 98.12म आहे. मार्च 2020 पासून आतापर्यंतच्या कालावधीतील हा उच्चांकी रोगमुक्ती दर आहे.
केंद्र सरकार तसेच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारे यांच्या शाश्वत आणि सहयोगात्मक प्रयत्नांमुळे, गेले सलग 113 दिवस नोंदल्या जाणार्या नव्या कोविड बाधितांची संख्या 50,000 हून कमी असण्याचा कल कायम आहे. गेल्या 24 तासांत,13,596 नव्या कोविड ग-स्त रुग्णांची नोंद झाली. गेल्या 230 दिवसांतील ही सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. देशातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या 2 लाखांहून कमी असून सध्या 1,89,694 इतकी असून ही गेल्या 221 दिवसांतील सर्वात कमी आहे. देशात सध्या कोविड सक्रीय असलेल्या रुग्णांचे प्रमाण आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या संख्येच्या 0.56म आहे.
देशभरात कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याच्या क्षमता विस्ताराचे काम जारी आहे. गेल्या 24 तासांत देशात एकूण 9,89,493 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 59 कोटी 19 लाखांहून अधिक (59,19,24,874) चाचण्या करण्यात आल्या आहेत. देशभरात कोविड चाचण्या करण्याची क्षमता वाढविली जात असतानाच, साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 1.37 म असून गेले 115 दिवस हा दर 3म हून कमी राहिला आहे. तर दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर आज 1.37म आहे. दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर गेले सलग 49 दिवस 3म हून कमी आहे आणि आता गेले सलग 132 दिवस हा दर 5म हून कमी राहिला आहे.
इतर अपडेटस :
राज्ये केंद्रशासित प्रदेशांकडे अजूनही 10.72 कोटींपेक्षा अधिक लसीच्या न वापरलेल्या उपयोगी मात्रा शिल्लक आहेत.
कोविड प्रतिबंधक लसीच्या पहिल्या मात्रेचे 100म लसीकरण पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधानांनी देवभूमीच्या लोकांचे अभिनंदन केले.
कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर सरकारने पर्यटन क्षेत्राला आधार देण्यासाठी अनेक उपाययोजना केल्याचे श्रीपाद नाईक म्हणाले.
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी पुणे महानगरपालिकेच्या कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेतला.