खताच्या वाढत्या किंमतीवरुन प्रियंका गांधीची सरकारवर टिका

नवी दिल्ली,

भाजप सरकारने एनपीकेच्या किंमती 275 रुपये आणि एनपी 20 रुपयांने वाढविल्या आहेत तर डिझेलच्या किंमती रोज वाढत आहेत आणि 100 रुपयां पर्यंत पोहचल्या आहे. भाजप शासनामध्ये मजूर व शेतकरी महागाईच्या ओझ्याखाली दबत आहे परंतु मोदींचे मित्र श्रीमंत होत आहे असा आरोप काँग-ेसच्या महासचिव प्रियंका गांधी वाड्रांनी रविवारी केला.

काँग-ेसच्या महासचिव प्रियंका गांधी वाड्रानी रविवारी पेरणी हंगामाच्या आधी खताच्या किंमती वाढविण्यावर केंद्र सरकारवर टिका केली.

खत्याच्या वाढलेल्या किंमती या वर्षी 20 मेच्या अधिसूचनेनुसार 1 ऑक्टोबर ते 31 मार्च 2022 पर्यंत लागू राहतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली सीसीईएने हा निर्णय केला आहे. केंद्र सरकारने विशेष एक रक्कमी पॅकेजच्या रुपात डीएपीच्या अनुदानामध्ये 438 रुपये प्रति गोणी वाढविण्याचा निर्णय केला आहे. यामुळे शेतकर्‍यांना याच किंमतीवर डीएपी मिळू शकेल.

तीन सर्वाधिकपणे विकल्या जाणारे एनपीके ग-ेड (10:26:26, 20:20:0:13 आणि 12:32:16) च्या उत्पादनासाठी कच्च्या मालाच्या वाढत्या किंमती आंतरराष्ट्रीय किंमतींना केंद्राने 100 रुपये प्रति बॅग अनुदान वाढवून अवशोषीत केले आहे. या एनपीके ग-ेडोवर विशेष एक रक्कमी पॅकेजच्या रुपात यामुळे शेतकर्‍यांना हे खते स्वस्त किंमतीवर मिळू शकतील.

केंद्र सरकारने साखर कारखान्याद्वारा उप उत्पादच्या रुपात याच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी 2010 मध्ये आपल्या स्थापने नंतर पहिल्यांदा पोषक तत्व आधारित अनुदान (एनबीएस) योजनेच्या अंतर्गत मोलासेस (पीडीएम) तून पोटाश आणले आहे. या खताला पीडीएम 0:0:14:5:0 च्या नावाने ओळखले जाते आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!