परराष्ट्र मंत्री एस जयशंकर तीन दिवशीय दौर्यासाठी इस्त्रायलमध्ये दाखल
नवी दिल्ली,
भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ.एस.जयशंकर तीन दिवशीय दौर्यासाठी रविवारी इस्त्रायलची राजधानी तेल अवीवला पोहचले असून या दौर्याचा उद्देश इस्त्रायल बरोबर रणनीतिक भागेदारीला अजून मजबूत करणे आहे.
परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी टिवीटमध्ये म्हटले की शालोम इस्त्रायल. परराष्ट्र मंत्र्याच्या रुपात पहिल्यांदाच दौर्यावर आलो आहे. एका महान प्रवासाची वाट पाहत आहे.
आपल्या दौर्यात जयशंकर हे पर्यायी पंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री यायर लापिड बरोबर द्विपक्षीय बैठक करतील. या व्यतिरीक्त राष्ट्रपती आइजॅक हर्जोंग, पंतप्रधान नफताली बेनेंट आणि केसेट स्पीकर मिकी लेवीची भेट घेतील.
जुलै 2017 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इस्त्रायली दौर्याच्या दरम्यान भारत व इस्त्रायलने द्विपक्षीय संबंधाना एक रणनीतिक भागेदारी पर्यंत वाढविले होते. त्यावेळे पासून दोनीही देशातील संबंधानी ज्ञान आधारीत भागेदारीच्या विस्तारावर लक्ष केंद्रित केले आहे. यामध्ये मेक इन इंडिया पुढकाराला प्रोत्साहन देण्यासह नवाचार आणि संशोधनामध्ये सहयोग सामिल आहे.
जयशंकर इस्त्रायलमध्ये भारतवंशीय यहूदी समुदाय, इंडोलॉजिस्ट, भारतीय विद्यार्थ्यां बरोबर चर्चा करतील जे वर्तमानात इस्त्रायलमधील विद्यापीठांमध्ये आपले शिक्षण पूर्ण करत आहेत आणि हायटेक उद्योगासह व्यवसायीकां बरोबर चर्चा करतील.
हा दौरा पहिल्या महायुध्दाच्या दरम्यान या भागामध्ये आपल्या प्राणांची आहुती देणार्या भारतीय सैनिकांना श्रध्दांजली अर्पित करण्याची संधी असेल.