पर्यावरण संरक्षणासाठी लोक चळवळीचे उपराष्ट्रपतींचे आवाहन

नवी दिल्ली,

उपराष्ट्रपती एम. वैंकय्या नायडू यांनी आज पर्यावरण संरक्षणासाठी लोक चळवळीचे आणि विविध पर्यावरण संवर्धन कार्यात स्वेच्छेने सहभागी होण्याचे नागरिकांना आवाहन केले.

पर्यावरण विषयक चळवळींमध्ये विशेषत: युवा वर्गाने सक्रीय आघाडीवर राहून इतरांना शाश्वत पद्धती स्वीकारण्यासाठी प्रेरित करण्याचे आवाहन त्यांनी केले. “आपण निसर्गाची काळजी घेतली तर निसर्ग संपूर्ण मानवजातीची काळजी घेईल,“ हा मुद्दा युवकांनी केंद्र स्थानी ठेवावा असे ते म्हणाले.

आंध- प्रदेशातील कडियम या गावाला रोपवाटिकेच्या लोकप्रिय केंद्रात रूपांतरित करण्याचे श्रेय ज्यांना दिले जाते, असे दिवंगत पल्ला वैंकण्णा यांच्या जीवनकथेवर आधारित ‘नर्सरी राज्यनिकी राराजू‘ या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी नायडू बोलत हेते.

वेगवान शहरीकरण आणि जंगलतोडीच्या परिणामांची दखल घेत, नायडू म्हणाले की, महापूर आणि जगाच्या विविध भागांमध्ये झालेल्या भूस्खलनासारख्या घटनानांप्रमाणे,अलिकडच्या काळात हवामान विषयक अतितीव- घटनांमध्ये वाढ झाली आहे.

हवामानाच्या अशा प्रकारच्या घटना कमी करण्यासंदर्भात नायडू म्हणाले की, प्रगती करताना, आपण निसर्गाशी साहचर्य राखणे आवश्यक आहे. आपण आपल्या विकासात्मक गरजा आणि पर्यावरण संरक्षण यामध्ये आपण समतोल साधला पाहिजे. “ पर्यावरणाचे मोल लक्षात घेतले जाईल तेव्हाच खर्‍या अर्थाने विकास शक्य होईल,“ असे नायडू म्हणाले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!