केरळमधील अतिवृष्टी आणि भूस्खलनाबद्दल पंतप्रधानांची केरळच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा
नवी दिल्ली,
केरळमधील अतिवृष्टी आणि भूस्खलनाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्याशी चर्चा केली. केरळमध्ये अतिवृष्टी आणि भूस्खलनामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी तीव- दु: ख व्यक्त केले आहे.
ठकेरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्याशी संवाद साधला आणि केरळमध्ये अतिवृष्टी आणि भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीसंदर्भात चर्चा केली.जखमी आणि बाधितांना मदत करण्यासाठी प्रशासन घटनास्थळांवर कार्यरत आहे. मी प्रत्येकाच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी प्रार्थना करतो.
केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे काही लोकांनी आपला जीव गमावला हे दु:खद आहे. शोकाकुल कुटुंबीयांप्रती शोकभावना‘ असे पंतप्रधानांनी टिवटरवर म्हटले आहे.