भारत-अमेरिका आर्थिक आणि वित्तीय भागीदारी संवादाची 8 वी मंत्रीस्तरीय बैठक वॉशिंग्टन डीसी येथे पार पडली
नवी दिल्ली,
भारत-अमेरिका आर्थिक आणि वित्तीय भागीदारी संवादाची 8 वी मंत्रीस्तरीय बैठक वॉशिंग्टन डीसी येथे झाली. केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन आणि अमेरिकेच्या कोषागार सचिव डॉ. जेनेट येलेन यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.
भारत-अमेरिका आर्थिक आणि वित्तीय भागीदारी संवादाच्या मंत्रिस्तरीय बैठकी दरम्यान. व्यापक आर्थिक दृष्टीकोन आणि कोविड -19 परिस्थितीत सुधारणा , आर्थिक नियामक आणि तांत्रिक सहकार्य, बहुपक्षीय सहभाग, हवामान बदल रोखण्यासाठी गुंतवणूक आणि मनी लाँडरिंग प्रतिबंध आणि दहशतवादाला होणार्या वित्तपुरवठ्याला आळा घालण्यासह ( एएमएलसीएफटी) विविध विषयांवर चर्चा झाली . परस्पर आणि जागतिक आर्थिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि सौहार्दपूर्ण रणनीती आणि उपाययोजनांच्या दिशेने प्रयत्न करण्यासाठी दोन्ही देशांनी द्विपक्षीय आणि बहुपक्षीय मंचांवर सहकार्य सुरू ठेवण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री आणि अमेरिकेचे कोषागार सचिव यांनी संयुक्त निवेदन दिल्यानंतर बैठकीचा समारोप झाला.