सिंघू सीमेवर युवकाची हत्या; व्यासपीठासमोर मृतदेह लटकवला
नवी दिल्ली,
दिल्ली-हरियाणाच्या सिंघू सीमेवरून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका तरुणाची निघृर्ण हत्या करण्यात आली आहे. युवकाचा हात कापून बॅरिकेडला लटकवला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ही घटना सिंघू सीमेवर घडली. मृत युवकाचं वय 35 वर्ष होतं.
मिळालेल्या माहितीनुसार, तरुणांचा मृतदेह आंदोलकांच्या मुख्य स्टेज बॅरिकेडजवळ लटकलेला आढळला. मृतदेह सापडल्यानंतर खळबळ उडाली आहे. सुरुवातीला पोलिसांना मृतदेहाजवळ जाण्याचीही परवानगी दिली जात नव्हती. परंतु पोलिसांनी कसे तरी तेथे पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
हत्येपूर्वी तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. हत्येनंतर त्याचे हा कापण्यात आल्याची ही माहिती आहे. मृतदेहाची ओळख पटलेली नाही. मृत युवकावर गुरु ग-ंथ साहिबची विटंबना केल्याचा आरोप आहे. धरणे स्थळी उपस्थित असलेल्या निहंगांनी ही घटना घडवून आणल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
पुढल्या महिन्यात शेतकरी आंदोलनाला एक वर्ष –
दिल्ली-हरियाणाच्या विविध सीमांवर, 40 शेतकरी संघटनांच्या संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली, केंद्र सरकारच्या तीन नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात निदर्शने सुरू आहेत. काही दिवसात या आंदोलनाला एक वर्ष पूर्ण करेल. सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये चर्चेच्या अनेक फेर्याही झाल्या. पण आतापर्यंत कोणताही ठोस निकाल लागला नाही.