कोविड-19 प्रतिबंधक लसीची राज्येकेंद्रशासित प्रदेशातील उपलब्धतेची अद्यावत माहिती

नवी दिल्ली

देशभरातल्या कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण अभियानाचा वेग आणि व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे. कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाच्या नव्या टप्प्याला

21 जून 2021 पासून सुरुवात झाली. अधिक लसींच्या उपलब्धतेच्या माध्यमातून लसीकरणाला गती दिली आहे. राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना लसींच्या या उपलब्धतेची

पूर्वसूचना दिली आहे जेणेकरुन ते लसीकरणाचे अधिक उत्तम नियोजन करु शकतील आणि लसींची पुरवठा साखळी सुरळीत राखता येईल.

देशव्यापी लसीकरण अभियानाअंतर्गत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड प्रतिबंधक लसीच्या मोफत मात्रा देत केंद्र सरकार सहकार्य करत आहे. केंद्र सरकार कोविड-19 प्रतिबंधक

लसीकरणाच्या नव्या टप्प्यात देशातील लस उत्पादकांकडून 75 टक्के लसींची खरेदी करून राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना त्याचा मोफत पुरवठाकरत आहे .

केंद्र सरकारने आतापर्यंत 97 कोटींपेक्षा जास्त (97,00,24,165) लसींच्या मात्रा राज्येकेंद्रशासित प्रदेशांना (मोफत) आणि थेट राज्याद्वारे खरेदी प्रक्रियेच्या अर्थात सर्व स्रोतांच्या माध्यमातून उपलब्ध केल्या आहेत.

राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांकडे 8.22 (8,22,69,545) कोटी न वापरलेल्या  उपयोगी मात्रा अजूनही शिल्लक आहेत.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!