177 आदिवासी उत्पादनांना भौगोलिक मानांकन मिळवून देण्यासाठी ट्रायफेड कार्यरत
या कामी वैश्विक पातळीवरील सहकार्य मिळवण्यासाठी भारतीय वकिलातींमध्ये ‘आत्मनिर्भर भारत कक्ष’ उभारण्यात येणार
नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर 2021
काही सर्वाधिक अनोख्या कलाकृतींच्या निर्मितीच्या बाबतीत भारतातील आदिवासींकडे असलेली पारंपारीक कलेतील पारंगतता जपण्यासाठी आणि वाढवण्यासाठी आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ मर्यादित म्हणजेच ट्रायफेडने जीआय टॅग म्हणजेच भौगोलिक मानांकन मिळवून देण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. आदिवासी स्रोत असलेल्या विविध उत्पादनांना भौगोलिक मानांकन मिळवून विक्री करणे या माध्यमातून विशिष्ठ भौगोलिक वैशिष्ठ्ये असलेल्या कृषीमाल, नैसर्गीक उत्पादने वा संबधित प्रदेशाची वैशिष्ट्ये असणारी मानवनिर्मित उत्पादने यांचे महत्व जपण्यासाठी व वृद्धींगत करण्यासाठी ट्रायफेड कटीबध्द असेल. यामुळे अविश्वसनीय भारतातील समृद्ध खजिना जपला जाईल.
याबाबतीत जागतिक पातळीवर पुढाकार नोंदवत उच्चायुक्त कार्यालयात आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ मर्यादितच्या सहकार्याने आत्मनिर्भर भारत कक्ष तयार करण्यात आला आहे. भारतभरातील आदिवासीं शतकानुशतके तयार करत असलेल्या उत्पादनांना प्रोत्साहन मिळवून देण्याचा उद्देश यामागे आहे.
सध्या ट्रायफेडने आदिवासीकडून निर्मित वा निर्मितीत अदिवासींचा सहभाग असलेल्या भारतीय मानांकन अर्ज केलेल्या तीनशेंहून जास्त उत्पादनांपैकी भौगोलिक मानांकनप्राप्त 56 उत्पादनांचे विपणन त्यांच्या 141 भारतीय आदिवासी विक्री केंद्रांच्या जाळ्यामार्फत तसेच इकॉमर्स मंचावरून सुरू केले आहे.
याशिवाय, देशभरातील अनेक राज्यांमधून असलेल्या स्थानिक कार्यालयातून आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ मर्यादित म्हणजेच ट्रायफेड आजून 177 उत्पादनांना भौगोलिक मानांकन देण्यावर काम करत आहे. यातील 10 उत्पादने महाराष्ट्रात आहेत.
भौगोलिक मानांकनाचे अंगिकारलेले हे उद्दिष्ट आजादी का अमृतमहोत्सव म्हणजेच भारत@75 तसेच वोकल फॉर लोकल आणि आत्मनिर्भर भारत या पंतप्रधानांच्या आवाहनाशी सुसंगत आहे.
भौगोलिक मानांकन कल्पनेला मजबूती देण्यासाठीचे उपक्रम
TRIFED – PMO – LBSNAA
आदिवासी उगमस्थळ असलेल्या उत्पादनांना चालना व त्यांचे विपणन तसेच त्यांचा ब्रॅण्ड होऊन त्यामार्फत आदिवासी कलाकारांचे सक्षमीकरण होण्यासाठी आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ मर्यादितने पंतप्रधान कार्यालयाशी भागीदारी केली आहे.
ट्रायफेड – नाबार्ड
आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ मर्यादित आणि राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक म्हणजेच नाबार्डने अश्या वस्तूंच्या विनियोगतून उपलब्ध होणाऱ्या संसाधनांना सामायिक करत भौगोलिक मानांकनाला वेग व बळकटी देण्याच्या दिशेने हातमिळवणी केली आहे.
ट्रायफेड – परराष्ट्र व्यवहार मंत्रालय
ट्रायफेड म्हणजेच आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ मर्यादित आणि परराष्ट्र मंत्रालयाने एकत्र येत समृद्ध आदिवासी संस्कृती आणि परंपरा यांना भारतीय वकिलातींच्या माध्यमातून वैश्विक व्यासपीठ मिळवून देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. अनेक अनोख्या आदिवासी उत्पादनांना प्रोत्साहन व त्यांचे विपणन करण्याच्या दृष्टीकोनातून ट्रायफेडने ओटावा, कुवैत, बँकॉक, क्रोएशिया या ठिकाणच्या भारतीय वकिलातीत ‘आत्मनिर्भर कक्ष ’ सजविला आहे.