डीडी चंदनाचे दहा लाखांहून अधिक सब्स्क्रायबर्स, डिजिटल प्रसार भारतीला दक्षिणेत चालना
नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर 2021
दर्जेदार आशय आणि डिजिटल फर्स्ट दृष्टिकोनासह दक्षिण भारतात प्रसार भारतीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मने केवळ दोन वर्षात खूप मोठा पल्ला गाठला आहे.
डीडी चंदना (कर्नाटक) यूट्यूबवर दहा लाख ग्राहकांचा टप्पा गाठणारी दक्षिण भारतातील पहिली वाहिनी बनली असून डीडी सप्तगिरी (आंध्र प्रदेश) आणि डीडी यादगिरी (तेलंगणा) पाच लाखांच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहेत.
प्रत्येकी 1 लाखाहून अधिक यूट्यूब सब्सक्राइबर्ससह, तमिळ आणि मल्याळम वृत्त विभाग आणि दूरदर्शनची केंद्रे एकमेकांशी आणि स्थानिक भाषा प्रसार माध्यम उद्योगाशी निकोप स्पर्धा करत आहेत.
या यूट्यूब चॅनेलवर सर्वाधिक पाहिलेल्या व्हिडिओमध्ये विनोदी कार्यक्रम, टेलिफिल्म्स, मान्यवरांच्या मुलाखती आणि शैक्षणिक सामग्री यांचा समावेश आहे.
दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिन्यांमध्ये, आंतरराष्ट्रीय इंग्रजी वृत्तवाहिनी ‘डीडी इंडिया’ने अलीकडेच यूट्यूबवर 1 लाख प्रेक्षकांचा टप्पा ओलंडला आहे. विशेषतः तरुण आणि जागतिक प्रेक्षकांसाठी तयार केलेल्या भारताबाबत माहिती देणाऱ्या विशिष्ट आशयघन कार्यक्रमांचा यात महत्वाचा वाटा आहे.