कोविड-19 बाबत ताजी माहिती

नवी दिल्ली 13 OCT 2021

देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत   आतापर्यंत 96.43 कोटी लसीच्या   मात्रा देण्यात आल्या आहेत

गेल्या 24 तासांत 15,823  नवीन   रुग्णांची नोंद झाली

सध्या रुग्ण बरे होण्याचा दर   98.06% ; मार्च 2020 पासून सर्वाधिक दर

गेल्या 24 तासात 22,844   रुग्ण बरे झाले; एकूण बरे झालेल्या रुग्णांची   संख्या वाढून 3,33,42,901

उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण   रुग्णसंख्येच्या   1% पेक्षा कमी आहे, सध्या त्याचे प्रमाण 0.61 % आहे, मार्च 2020 पासून सर्वात कमी

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 2,07,653 आहे; 214 दिवसातली ही सर्वात कमी संख्या आहे.

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (1.46% ) गेले 110   दिवस 3% पेक्षा कमी

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (1.19 %) गेले 44  दिवस 3% पेक्षा कमी

आतापर्यंत एकूण 58.63 कोटी   चाचण्या करण्यात आल्या.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!