आर्यन खानचा तुरुंगातील मुक्काम वाढला, आजची सुनावणी टळली, पुढची सुनावणी बुधवारी
नवी दिल्ली,
क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी आर्यन खानचा मुक्काम बुधवारपर्यंत एनसीबी कोठडीतच असणार आहे. कारण आता आर्यनच्या जामीन अर्जावर थेट बुधवारी सुनावणी करण्यात येणार आहे. मुंबईतील क्रूझ ड्रग्स प्रकरणी आर्यन खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावणी आली होती. परंतु, एनसीबीनं याचिकेवर उत्तर देण्यासाठी मागितला वेळ मागितला होता. या प्रकरणी किमान 2 ते 3 दिवसांचा वेळ देण्याची विनंती सरकारी वकिलांनी कोर्टाकडे केली आहे. अशातच आर्यन खानच्या जामीनावर बुधवारपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश एनसीबीला देण्यात आले आहेत. त्यामुळे आता आर्यन खानसह इतर आरोपींच्या जामीन अर्जावर आता थेट बुधवारी सुनावणी घेतली जाणार आहे.
क्रूज ड्रग्स प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सह तीन लोकांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी घेण्यात आली. परंतु, एनसीबीनं याचिकेवर उत्तर देण्यासाठी मागितलेल्या वेळामुळे आजची सुनावणी टळली असून आता थेट बुधवारी सुनावणी होणार आहे. दरम्यान, शनिवारी मुंबई लोअर कोर्टाने आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. लोअर कोर्टाचं म्हणणं होतं की, एनडीपीएसच्या ज्या कलमांतर्गत गुन्हा दाखल आहे, त्या कलामांतर्गत जामीन याचिकेवर सुनावणी घेण्याचा त्यांना अधिकार नाही.
लोअर कोर्टाचे हे निर्देश येईपर्यंत संध्याकाळचे 5 वाजले होते. त्यामुळे आर्यनसह तीन आरोपींचे वकील सेशन्स कोर्टात याचिका दाखल करु शकले नाही. तर शनिवारी आणि रविवारी कोर्ट बंद असल्यामुळे आज सोमवारी तिनही आरोपींचे वकील कोर्टात याचिका दाखल करु शकतात. तसेच या याचिकांवर आज सुनावणी होऊ शकते.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं 3 ऑॅक्टोबर रोजी आर्यन खान आणि त्याच्यासोबत इतर आरोपींना एक लग्जरी क्रूझवरील पार्टीमध्ये ड्रग रेड दरम्यान, ताब्यात घेतलं होतं. एनसीबीनं दावा केला होता की, या कारवाई दरम्यान, क्रूझवरुन अनेक वेगवेगळ्या ड्रग्स जप्त करण्यात आल्या. त्यानंतर आरोपींवर एनडीपीएस अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आर्यनसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धेमेचा यांचा जामीन फेटाळला
शुक्रवारी क्रूझ ड्रग्स प्रकरणात मुंबईतील फोर्ट कोर्टात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. याचा अर्थ आर्यन खानला सध्या तुरुंगात राहावे लागेल. गुरुवारी या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. आर्यनसोबत अरबाज मर्चंट आणि मुनमुन धेमेचा यांचाही जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.
आर्यन गुरुवारी रात्री एनसीबीच्या कार्यालयात थांबला
न्यायालयाने म्हटले की कोविड अहवालाशिवाय आरोपींना तुरुंगात नेले जात नाही, त्यामुळे सर्वांना गुरुवारी रात्री र्ण्ँ कार्यालयात राहावे लागेल. जे आरोपीच्या वकिलांनी मान्य केले. कोर्टात सुनावणीदरम्यान, एनसीबीने आरोपीच्या एनसीबी कोठडीत वाढ करण्याची विनंती केली. मात्र, न्यायालयाने त्याला परवानगी दिली नाही.
कधी झाली अटक?
आर्यन खान, मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांना एनसीबीने 3 ऑॅक्टोबर रोजी गोवाला जाणार्या क्रूझवर छापेमारीदरम्यान अटक केली होती, तर उर्वरित पाच इतर आरोपींना दुसर्या दिवशी अटक करण्यात आली होती. रिमांड कालावधी संपल्यानंतर आरोपींना अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी आर एम नेर्लीकर यांच्यासमोर हजर करण्यात आले. येथून त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.