बलात्कारातील आरोपी उपपोलिस निरीक्षकाकडे दुसर्या पोलिसाने लाच मागितली, सीबीआयने पकडले
नवी दिल्ली,
एका पोलिस कर्मचार्यांकडून लाच घेतल्याच्या आरोपामध्ये केंद्रिय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) ने अन्य दोन पोलिस कर्मचार्यांना अटक केल्याची माहिती दिल्ली पोलिसमधील एका अधिकार्याने रविवारी दिली.
अधिकार्याने सांगितले की सीबीआयने शनिवारी रात्री उशिरा मालवीय नगर ठाण्यात छापेमारी केली व आरोपी सहाय्यक उपनिरीक्षक लेखरामला 50 हजार रुपयांच्या नगदीसह अटक केली.
प्रकरणाची माहिती देताना अधिकार्याने सांगितले की दक्षिण जिल्ह्यात तैनात एका महिला पोलिस कॉस्टेंबलने 3 ऑगस्टला उपनिरीक्षक मनोजच्या विरोधात बलत्काराची तक्रार नोंदवली होती.
तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी भारतीय दंड संहितेचे कलम 376 आणि 506 च्या अंतर्गत गुन्हा नोंदविला होता आणि तपास महिला उपनिरीक्षक रोमी मेमरोथकडे दिला होता.
प्रकरणातील तपास अधिकारी असलेल्या एसआय रोमी आणि एएसआय लेखराम दोघांनी प्रकरणाला निपटण्यासाठी बलात्कारातील आरोपी एसआय मनोजकडे पैसे मागितले होते.
बलात्कारातील आरोपी एसआय मनोजने त्यावेळी सीबीआयला सूचित केले असता सीबीआयने या दोनीही अधिकार्यांना पकडण्यासाठी जाळे परसविले होते.
अधिकार्याने म्हटले की शनिवारी रात्रीला जवळपास 8 वाजता मनोज ठाणे मालवीय नगरमध्ये आला होता. येथेच त्याने एसआय रोमीना बोलावले होते. मनोजने त्याना सांगितले की ते सर्व कागदपत्र घेऊन आले आहेत परंतु एसआय रोमी तेथे उपस्थित नव्हत्या. यामुळे त्यानी एएसआय लेखरामकडे हे देण्यास सांगितले. लेखरामने जसेच पैसे आणि कागदपत्र घेतले असता सीबीआयच्या टिमने त्याना 50 हजार रुपयांसह रंगे हात पकडले. अधिकार्याने सांगितले की दोनीही आरोपी आता सीबीआयच्या ताब्यात आहेत.
बलात्कारातील आरोपी एसआय मनोजचे प्रकरण अजूनही दिल्लीतील एका न्यायालयात विचाराधीन आहे आणि सुनवाईची पुढील तारीख 11 ऑक्टोबर आहे.