संकटग-स्त भूतकाळाशी नाळ तोडत ईशान्य प्रदेश पुनरुत्थानाच्या नव्या युगाचा साक्षीदार असल्याचे उपराष्ट्रपतींचे ठाम प्रतिपादन
नवी दिल्ली,
ईशान्य प्रदेशात गेल्या 7 वर्षांमध्ये आर्थिक आणि मानव विकास निर्देशांकामध्ये लक्षणीय सुधारणा, पायाभूत सुविधांच्या विकासाचा विस्तार होण्यासह बंडखोरीत तीव- घट दिसून आली असून ईशान्य प्रदेश (एनईआर) आता आपल्या संकटग-स्त भूतकाळाशी असलेली नाळ निर्णायकपणे तोडत पुनरुत्थानाच्या नव्या युगाची साक्ष देत आहे ,असे ठाम प्रतिपादन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केले.
अरुणाचल प्रदेश विधानसभेच्या विशेष सत्रात भाषण देताना या प्रदेशाच्या वारशासंदर्भात श्री नायडू विस्ताराने भाष्य केले. लोकशाहीच्या अंमलबजावणीतील अडथळे दूर करून, दुहेरी विकास साधत, अलिकडच्या वर्षांत एका नव्या दिशेने आणि विकासाची गती राखत झालेला बदल त्यांनी अधोरेखित केला.
याआधी, विस्तृत वांशिक विविधता असलेल्या प्रदेशात लोकांमध्ये असमानता वाढल्याने, विशेषत:, स्वत:ची ओळख आणि संस्कृती याबद्दल चिंतीत असणार्या लोकांमध्ये विकासाच्या पद्धती संदर्भात आधीच संशयाचे वातावरण होते त्यात असमानता वाढून अपुर्या आणि असमान विकासाने इथल्या स्थानिक लोकांच्या मनातील लोकशाहीवरचा विश्वास डळमळीत झाला आहे, असे ते म्हणाले.
श्री नायडू यांनी अरुणाचल प्रदेश विधानसभा ग-ंथालय, कागद पुनर्वापर कक्ष आणि दोरजी खांडू सभागृहाचे उद्घाटन केले.”या प्रभावी विधानसभा इमारतीतील या निश्चितच मौल्यवान गोष्टी आहेत” असे, त्यांनी सांगितले. अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल बि-गेडियर (निवृत्त) (डॉ.) बी. डी. मिश्रा , मुख्यमंत्री श्री. पेमा खांडू अरुणाचल विधानसभेचे अध्यक्ष श्री पासंग दोरजी सोना, मंत्री आणि आमदार यावेळी उपस्थित होते.