संकटग्रस्त भूतकाळाशी नाळ तोडत ईशान्य प्रदेश पुनरुत्थानाच्या नव्या युगाचा साक्षीदार असल्याचे उपराष्ट्रपतींचे ठाम प्रतिपादन

गेल्या 7 वर्षांत आर्थिक आणि मानवी विकास निर्देशांक, पायाभूत सुविधांमध्ये  वाढ आणि बंडखोरीमध्ये तीव्र घट झाल्याचे नायडू यांनी केले अधोरेखित

अरुणाचल प्रदेश विधानसभेच्या विशेष सत्रात उपराष्ट्रपतींचे भाषण

Image

नवी दिल्ली 09 OCT 2021

ईशान्य प्रदेशात गेल्या 7 वर्षांमध्ये आर्थिक आणि मानव विकास निर्देशांकामध्ये लक्षणीय सुधारणा, पायाभूत सुविधांच्या विकासाचा विस्तार होण्यासह बंडखोरीत तीव्र घट दिसून आली असून ईशान्य प्रदेश (एनईआर) आता आपल्या संकटग्रस्त भूतकाळाशी असलेली नाळ निर्णायकपणे तोडत पुनरुत्थानाच्या नव्या युगाची साक्ष देत आहे ,असे ठाम प्रतिपादन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केले. 

अरुणाचल प्रदेश विधानसभेच्या विशेष सत्रात भाषण देताना या प्रदेशाच्या वारशासंदर्भात श्री नायडू  विस्ताराने भाष्य केले. लोकशाहीच्या अंमलबजावणीतील अडथळे दूर करून, दुहेरी विकास साधत, अलिकडच्या वर्षांत एका नव्या दिशेने आणि विकासाची गती राखत  झालेला  बदल त्यांनी अधोरेखित केला.

याआधी, विस्तृत वांशिक  विविधता असलेल्या प्रदेशात  लोकांमध्ये असमानता वाढल्याने, विशेषतः, स्वतःची ओळख आणि संस्कृती याबद्दल चिंतीत असणाऱ्या लोकांमध्ये विकासाच्या पद्धती संदर्भात आधीच संशयाचे वातावरण होते त्यात असमानता वाढून अपुऱ्या आणि असमान विकासाने इथल्या स्थानिक लोकांच्या मनातील लोकशाहीवरचा विश्वास डळमळीत झाला आहे, असे ते म्हणाले.

श्री नायडू यांनी अरुणाचल प्रदेश विधानसभा ग्रंथालय, कागद पुनर्वापर कक्ष आणि दोरजी खांडू सभागृहाचे उद्घाटन केले.”या प्रभावी विधानसभा इमारतीतील या निश्चितच मौल्यवान गोष्टी आहेत” असे, त्यांनी सांगितले. अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल ब्रिगेडियर (निवृत्त)  (डॉ.) बी. डी. मिश्रा , मुख्यमंत्री श्री.  पेमा खांडू अरुणाचल विधानसभेचे अध्यक्ष श्री पासंग दोरजी सोना, मंत्री आणि आमदार यावेळी उपस्थित होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!