मला मुख्यमंत्री बनविले असते तर यश दाखविले असते – नवजोत सिध्दू
नवी दिल्ली,
मला पंजाबचे मुख्यमंत्री बनविले असते तर यश दाखविले असते अशी खंत काँग-ेसचे पंजाब प्रदेशाध्यक्ष नवजोत सिंह सिंध्दूनी व्यक्त केली.
आपल्या बोलण्याने सतत प्रसिध्दीमध्ये राहणारे माजी क्रिकेटर व काँग-ेसचे पंजाब प्रदेशाध्यक्ष नवजोत सिंह सिंध्दूनी आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर ते परत एकदा वक्ताव्याने प्रसिध्दीच्या वलयात राहत आहेत यावेळी मुख्यमंत्री पदाची खुर्ची न मिळाल्याने सिध्दूने नाराजी व्यक्त केली.
काँग-ेस पक्षश्रेष्ठीनी चरणजीत सिंह चन्नीना मुख्यमंत्री बनविल्या पासून नाराज सिध्दूने म्हटले की मला मुख्यमंत्री बनविले असते तर यश दाखविले असते.
गुरुवारी प्रसारीत झालेल्या एका व्हिडीओमध्ये नवजोत सिध्दू पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी बाबत अपशब्द बोलताना दिसून आले. याच बरोबर सिध्दू या व्हिडीओमध्ये म्हणत होते की चन्नी 2022 मध्ये काँग-ेसच्या नौकेला बुडवतील. हा व्हिडीओ पंजाबमधील जीरकपूरचा आहे.
गुरुवारी सकाळी लखीमपुर खीरीला जात असलेले सिध्दू आपल्या विरोध मार्चला सुरु करण्यासाठी पंजाबचे मुख्यमंत्री चन्नीची वाट पाहत होते परंतु चन्नीना येण्यात उशिर झाल्याने सिध्दूने संतापून त्यांच्या विरोधात अपशब्दांचा वापर केला. मात्र काही वेळेनंतर चन्नी तेथे पोहचले. पंजाब काँग-ेसकडून प्रसिध्द एका दुसर्या व्हिडीओमध्ये चन्नी आणि सिध्दूला एका ट्रॉलीवर एकत्र पाहिले जाऊ शकते
नवजोत सिंह सिंध्दूनी नुकतेच चन्नी सरकारमध्ये होत असलेल्या नियुक्तींवर आक्षेप व्यक्त करत पंजाब काँग-ेस अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. मात्र पक्ष सूत्रांनी सांगितले की सिंध्दू या पदावर कायम राहतील आणि त्यांना समजविले जाईल.
या आधी सिध्दू सतत पंजाब डीजीपी आणि एजीला हटविण्याची मागणी करत होते