खरीप विपणन हंगाम 2021-22 अंतर्गत धान खरेदीचा आतापर्यंत सुमारे 30,000 शेतकर्यांना फायदा
नवी दिल्ली,
खरीप विपणन हंगाम 2021-22 साठी धान खरेदी नुकतीच सुरू झाली असून गेल्या वर्षीप्रमाणेच या वर्षी देखील ही खरेदी एमएसपीनुसार केली जात आहे. 5 ऑॅक्टोबर 2021 पर्यंत एकूण 2,87,552 मेट्रिक टन धानाची खरेदी एमएसपीनुसार करण्यात आली आहे. 29,907 शेतकर्यांना त्याचा लाभ मिळाला असून त्यांना एमएसपीनुसार 563.60 कोटी रुपयांचा चुकारा देण्यात आला आहे. एकूण खरेदीपैकी हरयाणामधून 1,46,509 मेट्रिक टन तर पंजाबमधून 1,41,043 मेट्रिक टन धानाची खरेदी करण्यात आली आहे.
2020-21 च्या खरीप हंगामातील धान खरेदी 5 ऑॅक्टोबर 2021 पर्यंत एकूण 894.24 लाख मेट्रिक टन (खरीप पीक 718.09 लाख मेट्रिक टन आणि रब्बी पीक 176.15 लाख मेट्रिक टन) खरेदीने जवळजवळ पूर्ण झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ही खरेदी 768.70 लाख मेट्रिक टन होती. 2020-21 च्या हंगामात 131.14 लाख शेतकर्यांना लाभ मिळाला होता आणि त्यांना किमान हमी भावाने 1,68,832.78 कोटी रुपये चुकते करण्यात आले होते. 2019-20 च्या हंगामातील 770.93 लाख मेट्रिक टनाच्या सर्वोच्च पातळीला मागे टाकणारी ही खरेदी होती.