प्रधानमंत्री भारतीय जनौषधी योजनेने (पीएमबीजेपी) आर्थिक वर्ष 2021-22 साठी निर्धारित केलेले उद्दिष्ट केवळ 6 महिन्यांत पूर्ण केले

नवी दिल्ली,

भारतीय औषोधोत्पादन आणि वैद्यकीय उपकरणे विभाग (पीएमबीआय ), या प्रधानमंत्री भारतीय जनौषधी योजनेची (पीएमबीजेपी) अंमलबजावणी करणार्‍या संस्थेनं, 8,300 प्रधानमंत्री भारतीय जनौषधी केंद्र (पीएमबीजेके) सुरु करण्याचे आर्थिक वर्ष 2021-22 साठी निर्धारित केलेले उद्दिष्ट सप्टेंबर, 2021 अखेरीच्या आधीच पूर्ण केले आहे. देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री भारतीय जनौषधी योजनेनेअंतर्गत (पीएमबीजेपी) जनौषधी केंद्र सुरु करण्यात आली आहेत.

प्रधानमंत्री भारतीय जनौषधी योजनेनेअंतर्गत सध्या 1,451 औषधे आणि 240 शस्त्रक्रिया उपकरणे जनौषधी केंद्रांमध्ये उपलब्ध आहेत. आणखी नवीन औषधे आणि ग्लुकोमीटर, प्रथिने भुकटी, सत्वावर आधारित पूरक अन्नपदार्थ, प्रथिने वडी, रोग प्रतिकारशक्तीसाठीची वडी इत्यादी पोषणासाठीची उत्पादने देखील या केंद्रांमध्ये ठेवण्यात आली आहेत.

सर्वसामान्यांना विशेषत: गरीबांना परवडणार्‍या दरात दर्जेदार औषधे उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने, सरकारने मार्च 2024 पर्यंत प्रधानमंत्री भारतीय जनौषधी केंद्रांची (पीएमबीजेके) संख्या 10,000 पर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

प्रधानमंत्री भारतीय जनौषधी योजनेची सुविधा उपलब्ध करून देणारं ”जनौषधी सुगम‘ हे मोबाईल ऍप्लिकेशनने जनतेला ‘एक डिजिटल व्यासपीठ प्रदान केले आहे.

पीएम बीजेपी अंतर्गत उपलब्ध औषधांची किंमटी ब-ँडेड औषधांच्या किंमतीपेक्षा 50म -90म कमी आहेत. गेल्या आर्थिक वर्षात (2020-21) मध्ये पीएमबीजेपी ने 665.83 कोटी रुपयांच्या विक्रीचे (एमआरपी वर) उद्दिष्ट साध्य केले आहे. यामुळे देशातील सामान्य नागरिकांची 4,000 कोटी रुपयांची बचत झाली आहे.

कोविड 19 संकटाच्या पार्श्वभूमीवर, प्रधानमंत्री भारतीय जनौषधी योजना (पीएमबीजेपी ) देशाला अत्यावश्यक सेवा देत आहे. लॉकडाऊन दरम्यानही जनौषधी केंद्र कार्यरत राहिली.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!