देशातील लोकशाही भ-ष्ट झाली आहे? संजय राऊत यांची केंद्र सरकारवर टीका
नवी दिल्ली,
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत काँग-ेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. राहुल गांधी यांच्या निवासस्थानी तब्बल 20 मिनिटं या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली.
लखीमपूर खेरी हिंसाचार घटनेवर बोलताना संजय राऊत यांनी देशात लोकशाही उरली आहे का?, लोकशाही भ-ष्ट झाली आहे अशी टीका केली. लखीमपूर हिंसाचार घटनेसह देशातील इतर घटनांवर चर्चा झाल्याचं यावेळी संजय राऊत यांनी म्हटलं.
लखीमपूरची घटना आणीबाणीपेक्षा भयानक
उत्तर प्रदेशमधील लखीमपूरची घटना म्हणजे आणीबाणी पेक्षा भयानक असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव रक्ताने माखल्याचा टोला, शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावला. शेतकरी आंदोलन करताना लखीमपूरची दुर्घटना ही शेतकरी, मजूर यांच्यासाठी लांच्छनास्पद आहे. हा एका राज्याचा विषय नाही, अन्यायासाठी लढणार्यांना असे केले जातं असेल तर जगासाठी हे धोकादायक आहे. ही भारत पाकिस्तान लढाई आहेका, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
अशी घटना महाराष्ट्र, केरळ, राजस्थानमध्ये झाली असती तर भाजप रस्त्यावर उतरले असते. पण आज शेतकर्यांचे दु:ख समजावून घ्यायला पण तिथं कुणाला जाऊ दिल जातं नाही, असे राऊत म्हणाले. काँग-ेस सोबत मतभेद असू शकतात, पण इंदिरा गांधी यांच्या नातीला अशी वागणूक देत आहात, हे योग्य नाही, असे राऊत म्हणाले.
लखीमपूर घटनेची चौकशी करा
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लखीमपूर हिंसाचार घटनेच्या चौकशीची मागणी केली आहे. त्याचवेळी आपली बाजू मांडणार्या शेतकर्यावर दडपशाही करण्यात आली आहे. लखीमपूरची घटना हा शेतकर्यांवर झालेला हल्लाच आहे, शरद पवार म्हणाले. या घटनेची सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूतींर्कडून चौकशी व्हायला हवी, अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे.