बौद्ध पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी बौद्ध स्थळांवर पर्यटन मंत्रालय करणार परिषदेचे आयोजन

नवी दिल्ली,

देशात सध्या कोविड परिस्थितीमध्ये होत असलेली मोठी सुधारणा आणि लसीकरणाचे लक्ष्य साध्य झाल्यानंतर उद्योगातील भागधारकांच्या सहभागासह पर्यटन मंत्रालयाने धडाडीने पर्यटनाला प्रोत्साहन देण्यास सुरू केले आहे. भारतातील पर्यटन क्षेत्राच्या सर्वांगीण वाढीसाठी आणि विकासात परदेशी आणि देशांतर्गत पर्यटनाची महत्त्वाची भूमिका आहे.

बौद्ध पर्यटन हे भारतातील विविध पर्यटनांपैकी एक प्रमुख पर्यटन घटक आहे. पर्यटन मंत्रालय पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध प्रचारात्मक उपक्रम हाती घेत असते. हे उपक्रम प्रामुख्याने पर्यटन स्थळे, आकर्षणाचे केन्द्रबिन्दू आणि उत्पादनांविषयी जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने असतात.

बौद्ध पर्यटनातील शक्यतांचा, संधींचा उपयोग करण्यासाठी, पर्यटन मंत्रालयाने 04 ऑॅक्टोबर ते 08 ऑॅक्टोबर 2021 पर्यंत बौद्ध सर्किट ट्रेन एफएएम टूर आणि कॉन्फरन्स आयोजित केली आहे. एफएएम टूर बोधगया आणि वाराणसी येथील प्रमुख बौद्ध स्थळांना आणि परिषदांना भेट देईल.

पर्यटन मंत्रालयाच्या विविध योजनांअंतर्गत पर्यटनाशी संबंधित पायाभूत सुविधांच्या विकासाबरोबरच भारतातील आणि परदेशातील विविध बौद्ध स्थळांना प्रोत्साहन देण्यावरही भर दिला जात आहे. याचाच भाग म्हणून, परदेशी बाजारपेठेतील भारतीय पर्यटन कार्यालये नियमितपणे पर्यटन मेळाव्यांमध्ये तसेच प्रदर्शनांमध्ये सहभागी होतात. भारतातीतल बौद्ध स्थळांना त्यात प्रोत्साहन दिले जाते. तसेच, पर्यटन मंत्रालय भारताला महत्वाचे बौद्ध ठिकाण स्थापित करणे आणि त्याचा जगभरातील प्रमुख बाजारपेठांमधे प्रचार करण्याच्या उद्देशाने प्रत्येक वर्षाआड बौद्ध संमेलन आयोजित करते. आगामी आंतरराष्ट्रीय बौद्ध संमेलन 17 ते 21 नोव्हेंबर, 2021 दरम्यान नियोजित आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!