सलग पाचव्या दिवशी इंधन महागले, मुंबईत सर्वाधिक रेट
नवी दिल्ली,
भारतीय तेल कंपन्यांनी आज, मंगळवारी सलग पाचव्या दिवशी पेट्रोल-डिझेल दरात वाढ (झूीदत् ्गोत् ज्ीग्म प्ग्ज्ञा) केली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी आज दिल्लीत पेट्रोलचे दर 25 पैसे प्रति लीटरने वाढवले आहेत. तर डिझेल दरात आज 30 पैसे प्रति लीटरची वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीनंतर दिल्लीत 1 लीटर पेट्रोल 102.64 रुपये आणि डिझेल 91.07 रुपये प्रति लीटर झाले आहे.
अनेक राज्यांमध्ये पेट्रोल 100 रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहे. मुंबईत पेट्रोलचा दर सर्वाधिक आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने देशात पेट्रोल-डिझेल दरात वाढ होत आहे.
प्रमुख शहरांमधील पेट्रोल-डिझेलचे रेट
शहराचे नाव पेट्रोल डिझेल
दिल्ली 102.64 91.07
मुंबई 108.67 98.80
कोलकाता 103.36 94.17
चेन्नई 100.23 95.59
ण्र्उ आणि झ्र्उ महाग –
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती उच्चांक गाठत असताना सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक झटका बसला आहे. दिल्लीसह देशातील अनेक शहरांमध्ये सीएनजी आणि पीएनजीचे दर वाढले आहेत.