आसाम विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांच्या नावाची घोषणा
नवी दिल्ली,
आसाममध्ये तीन विधानसभा मतदारसंघात होणार्या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष (भाजप) ने आपल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. येथे 30 ऑक्टोंबरला अन्य राज्यातील 27 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकी बरोबर निवडणुक होत आहे.
भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंहनी एका निवेदनात म्हटले की भाजपच्या केंद्रिय निवडणुक समिती (सीईसी) ने आसाम विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांंवर निर्णय केला आहे. भाजपने आसाममधील भवानीपुरमधून फणीधर तालुकदार. मरियानीतून रुपज्योती कुर्मी आणि थोरातून सुशांत बोरगोहेनना तिकीट दिले आहे.
भाजपने रविवारी महाराष्ट्र, मिझोराम आणि तेलंगानामधील विधानसभा पोटनिवडणकीसाठी आपल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली होती. भाजपने हुजूराबादमधून तेलंगानाचे माजी आरोग्यमंत्री इटेला राजेंदर यांना तिकीट दिले आहे. महाराष्ट्रातील देगलूर (एससी) विधानसभा मतदारसंघातून सुभाष पिराजीराव सावने आणि मिझोराममधील तुइरियाल (एसटी) विधानसभा मतदारसंघातून के.लादिंथराना तिकीट दिले आहे.
जूनमध्ये राजेंद्र टिआरएसचा राजीनामा दिल्यानंतर भाजपमध्ये सामिल झाले होते. मेमध्ये त्यांना मेडक जिल्ह्यातील भूमि हडपल्याच्या आरोपावरुन तेलंगाना मंत्रीमंडळातून हटविले गेले होते. त्यांनी म्हटले होते की त्यांना चूकीच्या पध्दतीने निशाना बनविले गेले आहे.
भारत निवडणुक आयोग (ईसीआय) ने 28 सप्टेंबरला दादर आणि नगर हवेली. मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेशमधील तीन लोकसभा मतदारसंघातील रिक्त जागांना भरण्यासाठी मतदान कार्यक्रमाची घोषणा केली होती. निवडणुक आयोगाने विविध राज्यामध्ये रिक्त झालेल्या तीस विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणुका घेण्याची घोषणा केली निवडणुक आयोगाद्वारा विविध राज्यामधील विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकांसाठी 30 ऑक्टोंबरला मतदान होईल व 2 नोव्हेंबरला मतमोजणी होईल.
भाजपच्या एका सूत्राने सांगितले की राज्यातील शाखांनी नावांची शिफारस केल्यानंतर अन्य राज्यातील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली जाईल. पक्षातील एका नेत्याने म्हटले की राज्य केंद्रिय नेतृत्वाला शॉर्टलिस्ट केलेल्या नावांची शिफारस करतील आणि सीईसी नावाना अंतिम रुप देईल.