पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

नवी दिल्लीमुंबई,

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, गेल्या 24 तासात कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या 23,46,176 मात्रा देण्यात आल्या आहेत त्यामुळे भारताने 90.79 (90,79,32,861) कोटी कोविड-19 लसींच्या मात्रांचा टप्पा पार केला आहे. 88,05,668 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून या मात्रा देण्यात आल्या आहेत.

गेल्या 24 तासांत 26,718 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून) वाढून 3,31,21,247 झाली आहे. परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 97.89म झाला आहे. मार्च 2020 पासूनचा हा सर्वोच्च दर आहे.

केंद्र आणि राज्य सरकारकेंद्रशासित प्रदेश यांच्या एकत्रित प्रयत्नांचा परिणाम म्हणून सलग 99 दिवसांपासून 50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाल्याचा कल कायम राहिला आहे. गेल्या 24 तासात 20,799 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 2,64,458 असून ही रुग्णसंख्या गेल्या 200 दिवसातील निचांकी आहे. तसेच देशातील आतापर्यंतच्या एकूण बाधित रुग्णसंख्येच्या 0.78म आहे.

देशभरात चाचण्यांची क्षमता वाढत आहे. गेल्या 24 तासांमध्ये एकूण 9,91,676 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 57.42 कोटींहून(57,42,52,400) अधिक चाचण्या घेतल्या आहेत. देशभरात चाचणी क्षमता वाढवण्यात आली असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.63म असून गेल्या 101 दिवसांपासून हा दर 3म पेक्षा कमी राहिला आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 2.10म असून गेले सलग 35 दिवस हा दर 3 म पेक्षा कमी आहे आणि गेले सलग 118 दिवस हा दर 5म पेक्षा कमी आहे.

इतर अपडेटस :

लसीच्या 5.67 कोटी पेक्षा जास्त शिल्लक मात्रा राज्ये आणि केंद्र शासित प्रदेश आणि खाजगी रुग्णालयांकडे उपलब्ध आहेत.

लस वाहतुकीसाठी आयसीएमआरच्या ड्रोन आधारित मॉडेल आय-ड्रोनचा केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांच्या हस्ते प्रारंभ केला.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!