केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ.एल.मुरुगन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली

नवी दिल्ली,

केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसेच मत्स्यपालन, पशुपालन आणि दुग्धविकास राज्यमंत्री डॉ.एल. मुरुगन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. डॉ.एल. मुरुगन यांची राज्यसभा सदस्य म्हणून नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच त्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली आहे.

या भेटीदरम्यान डॉ.मुरुगन यांनी पंतप्रधानांना फथिरूक्कुरल- पर्ल्स ऑॅफ इन्स्पिरेशनङ्ग या पुस्तकाची प्रत भेट म्हणून दिली आणि नवीन भारतातील जनतेच्या कल्याणासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली परिश्रमपूर्वक काम करण्यासाठी त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!