महाराष्ट्र मंडळाच्या कार्यकारिणीची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट
नवी दिल्ली,
फरिदाबाद येथील महाराष्ट्र मंडळाच्या कार्यकारिणी सदस्यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्राला सदिच्छा भेट दिली.
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी तथा उपसंचालक (अ. का.) अमरज्योत कौर अरोरा यांनी महाराष्ट्र मंडळाच्या उपाध्यक्ष नीलांगी कलंगुटकर यांच्यासह कार्यकारिणी सदस्यांचे स्वागत केले. यावेळी माहिती अधिकारी अंजू निमसरकर, उपसंपादक रितेश भुयार उपस्थित होते.
यावेळी श्रीमती अरोरा यांनी परिचय केंद्राच्यातवीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. परिचय केंद्राद्वारे प्रकाशित करण्यात येणारी प्रकाशने, प्रसार माध्यमांशी साधण्यात येणारा समन्वय, कार्यालयाच्या सोशल मिडीयाहून देण्यात येणारी माहिती आणि दिल्लीस्थित विविध राज्यांच्या माहिती व जनसंपर्क विभागांशी साधण्यात येणारा समन्वय आदिंबाबत माहिती दिली.
राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्रातील (एनसीआर) फरिदाबाद भागात १९६४ मध्ये महाराष्ट्र मंडळाची स्थापना झाली. या मंडळाच्यावतीने आयोजित करण्यात येणारे विविध उपक्रम व यात मोठया प्रमाणात सहभागी होणारे फरिदाबाद भागातील मराठीजन याविषयी यावेळी कार्यकारिणीच्या सदस्यांनी माहिती दिली. महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष मिलिंद कारखानीस आणि त्यांच्या पत्नी, खजिनदार नरेंद्र बोथरे यावेळी उपस्थित होते.