पाकिस्तानच्या विरोधकांकडून टीटीपीसोबत चर्चा सुरू करण्याच्या सरकारच्या पाऊलाची निंदा
नवी दिल्ली,
जियो न्यूजच्या वृत्तानुसार, पाकिस्तानच्या विरोधी पक्षाने तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानचे (टीटीपी) काही समुहासोबत विना विचारविमर्श केल्याशिवाय चर्चा करण्याच्या सरकारच्या निर्णयाची निंदा केली आहे आणि पंतप्रधान इमरान खान यांच्याशी या मुद्यावर संसदला विश्वासात घेण्याचे आव्हन केले आहे. काही दिवसापूर्वी खान यांनी टीआरटी वर्ल्डसोबत एक मुलाखतीत खुलासा केला होता की त्यांचे सरकार टीटीपीचे काही समूहासोबत चर्चा करत आहे.
पीएमएल-एनचे सीनेटर इरफान सिद्दीकी यांनी सांगितले की टीटीपीसोबत चर्चा एक खुपच संवेदनशील मुद्दा आहे आणि विरोधकांना यावर अंधारात ठेवणे योग्य नाही.
जियो न्यूजच्या वृत्तात सांगण्यात आले की त्यांनी दहशतवादीसोबत शांती चर्चेच्या प्रक्रियेत सर्व हितधारकांना समाविष्ट करण्याचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या पाऊलाचा उल्लेख केला.
त्यांनी सांगितले की नवाज शरीफ यांच्या कार्यकाळात चर्चेला संसदने मंजूरी दिली होती.
त्यांनी सरकारशी या मुद्यावर पुढे चर्चा करण्यासाठी त्वरित संसदचे सत्र बोलवण्याची मागणी केली.
रिपोर्टमध्ये सांगण्यात आले की पीपीपी नेते शाजिया मारी यांनी त्या अटीवर प्रश्न उठऊन सरकारची कान उघडणी केली, ज्याच्या आधारावर ते प्रतिबंधित संघटनेला माफ करू इच्छिते.
टीआरटी वर्ल्डला दिलेल्या आपल्या मुलाखतीत, खान यांनी स्वीकारले की अफगान तालिबान दोन्ही पक्षात एकमेकांशी चर्चा करण्यात समाविष्ट होते.
त्यांनी सांगितले की मला वाटते की काही पाकिस्तानी तालिबान समूह वास्तवात आमच्या सरकारशी चर्चा करू इच्छित आहे. तुम्हाला माहित आहे, काही शांतीसाठी काही सुलहसाठी.
पाकिस्तान वास्तवात टीटीपीसोबत चर्चा करत आहे का? हे विचारल्यावर पंतप्रधानांनी स्पष्ट केले की त्यापैकी काहीसोबत चर्चा सुरू आहे.