स्वर्णिम विजय वर्षानिमित्त बांग्लादेश नौदलाचे जहाज विशाखापट्टणम येथे दाखल
नवी दिल्ली,
बांगलादेश नौदलाचे जहाज (बीएनएस) समुद्र अविजान 03 ऑॅक्टोबर 2021 रोजी पूर्व नौदल कमांड (ईएनसी) च्या पाच दिवसांच्या दौर्यासाठी विशाखापट्टणम येथे दाखल झाले. बांगलादेश नौदल जहाजाचा हा दौरा राष्ट्रपिता बंधू शेख मुजीबुर रहमान यांचे जन्मशताब्दी वर्ष आणि ज्यामुळे बांगलादेश स्वतंत्र झाला त्या 1971 च्या भारत-पाक युद्धाच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त स्वर्णीम विजय वर्ष यांच्या एकत्रित स्मृती प्रित्यर्थ बांगलादेश नौदलाची ही भेट आहे. बीएनएस सोमुद्र अविजानचे अधिकारी आणि कर्मचार्यांचे नौदलाच्या बँडसह पूर्व नौदल कमांड आणि पूर्व ताफ्यातील प्रतिनिधींनी पारंपरिक स्वागत केले.
व्यावसायिक संवाद, क्रॉस डेक भेटी, आयएनएस विश्वकर्मा आणि आयएनएस डेगा भेट यासह दोन नौदलांमध्ये उपक्रमांची मालिका नियोजित आहे. याशिवाय, बांगलादेश नौदलावर आधारित विशेष माहितीपट दाखवणे आणि 1971 च्या युद्धातील निवृत्त सैनिकांशी संवाद हे या भेटीचे प्रमुख आकर्षण असेल.सर्वोच्च स्तरावर, बांगलादेश दूतावासातील निवासी संरक्षण अधिकारी आणि बीएनएस समुद्र अविजान यांच्यासह, नवी दिल्लीतील बांगलादेश उच्चायोगाचे उच्चायुक्त मोहम्मद इम-ान यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ, पूर्व नौदल कमांडचे कमांडिंग- इन- चीफ ध्वज अधिकारी अतिविशिष्ट सेवा पदक आणि विशीष्ट सेवा पदक प्राप्त व्हाईस ऍडमिरल ए.बी.सिंह आणि नौदलाच्या पूर्व ताफ्याचे कमांडिंग ध्वज अधिकारी विशिष्ट सेवा पदक प्राप्त रिअर ऍडमिरल तरुण सोबती यांच्यासोबत अधिकृत चर्चा करेल.