अभिनेते मनोज वाजपेयी यांना पितृशोक, वडील राधाकांत वाजपेयी यांचं 83 व्या दिल्लीत निधन
नवी दिल्ली,
बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मनोज वाजपेयी यांच्या वडिलांचं निधन झालं आहे.
मनोज वाजपेयी यांचे वडील राधाकांत वाजपेयी यांचं आज सकाळी निधन झालं. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. 85 वर्षीय राधाकांत वाजपेयी यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
वडील आजारी असल्याची बातमी कळताच मनोज वाजपेयी यांनी केरळमध्ये सुरु असलेलं फिल्मचं शूटिंग सोडून दिल्ली गाठली होती. अभिनेते मनोज यांचं आपल्या वडिलांवर खूप प्रेम होतं. मनोज वाजपेयीच्या वडिलांच्या निधनाची बातमी ’डहए’ चे संचालक अविनाश दास यांनी या वृत्ताला दुजोरा देत टिवट केलं आहे.
अविनाश दास यांनी एका फोटोसह एक टिवट केलं आहे. या टिवटमध्ये त्यांनी लिहिलं की, मनोज भैय्याचे वडील आता नाहीत. त्यांच्यासोबत घालवलेले क्षण आता आठवत आहेत. मी हा फोटो भितिहरवा आश्रमात काढला होता. ते महान सहनशक्तीचा असलेलं व्यक्तीमत्त्व होतं. नेहमी स्वत:ला मुलाच्या ऐश्वर्याच्या स्पर्शापासून दूर ठेवले. माफक विणकाम करणारे ते मोठे व्यक्ती होते. अभिवादन श्रद्धांजली.
राधाकांत वाजपेयी यांच्या निधनाची माहिती मिळाल्यानंतर बॉलिवूड आणि अभिनेत्याचे मूळ गाव असलेल्या गौनाहा खंडाच्या बेलव्यात शोककळा पसरली आहे. गावातील लोकं सांगतात की, ते अत्यंत दयाळू होते. तसंच ते नेहमी गरीबांना मदत करायचे. गेले कित्येक महिने त्यांची प्रकृती खूपच खराब होती. अलीकडेच त्यांना दिल्लीतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
राधाकांत यांना तीन मुलं आहेत, ज्यात सर्वात मोठा मुलगा अभिनेते मनोज वाजपेयी आहे. मनोज यांच्या वडिलांनी त्यांना पश्चिम चंपारणमधील एका छोट्याशा खेडे गावातून मुंबईला पोहोचवण्यात मोलाचं योगदान दिलं आहे.